Home यवतमाळ ताटसावळी जि. प. शाळेत एक दिवसीय शिक्षण परिषद

ताटसावळी जि. प. शाळेत एक दिवसीय शिक्षण परिषद

7

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

ताटसावळी जि. प. शाळेत एक दिवसीय शिक्षण परिषद
———————————————
घाटंजी – पंचायत समिती अंतर्गत मधील कुर्ली केंद्राची शिक्षण परिषद दिनाक ६ जानेवारी ला जि. प. उ प्रा डिजिटल मराठी शाळा ताडसावळी येथे पार पडली.
ह्याच कार्यक्रमात गुणवंत विध्यार्थी गौरव सोहळा देखील संपन्न झाला. सलग तिन वर्षांपासून NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. विनोद चव्हाण ह्यांच्या हस्ते करण्यात आला.
ह्या शिक्षण परिषेदेचे उदघाटक म्हणून ठाणेदार विनोद चव्हाण होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटंजी पं. सं. च्या गटशिक्षण अधिकारी दिपाली गुल्हाने मॅडम उपस्थित होत्या.
ह्याच कार्यक्रमात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वंदना तिवारी मॅडम ह्यांचा केंद्राच्या वतीने साडीचोळी देऊन निरोप देण्यात आला तर कुर्ली शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. विजय ठाकरे ह्यांना शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षण परिषदेच्या सुरुवातीस आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून
ह्या शिक्षण परिषदेचे उदघाटन ठाणेदार विनोद चव्हाण ह्यांनी केले.
व आपल्या भाषणातून गुणवंत विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. तसेच गटशिक्षण अधिकारी दीपिका गुल्हाने मॅडम ह्यांनीही आपल्या भाषणातून शिक्षक तथा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ह्याच कार्यक्रमात NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची विध्यार्थ्यानकडून तयारी करून घेणारे श्री. पवन राठोड सर व अरुणा चिंतावार मॅडम ह्यांचा कार्यालयाकडून सत्कार करण्यात आला.
सदर परिषेदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख किशोर मालवीय ह्यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. सुनिल कुमरे सर ह्यांनी केले.
ह्या कार्यक्रमासाठी ताडसावळी शाळेचे सर्व शिक्षक श्री. संदीप लोहकरे सर. श्री. पवन राठोड सर. तथा अरुणा चिंतावार मॅडम कु पार्वती सोळंके मॅडम श्री.सुनिल कुमरे सर. मु. अ. मालवीय सर ह्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©