दत्ताजी खोपे प्रतिनिधी दारव्हा
दारव्हा तहसील परिसरातील प्रसाधन गृहाचे लोकार्पण तृतीपंथी भगिनिकडून..
——————————————–
दारव्हा- जिल्ह्यातील दारव्हा येथिल तहसिल कार्यालय परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र या ठिकाणी प्रसाधन गृह नव्हते त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडायची. ही बाब हेरून या ठिकाणी प्रसाधन गृह बांधण्यात आले. मात्र प्रसाधन गृह बांधून झाले असले तरी त्याचे लोकार्पण करून वापरास मोकळे करून दिल्या गेले नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी तृतीपंथी भगिनीला प्राचारन करून या प्रसाधन गृहाचे लोकार्पण करून जनतेस वापरास मोकळे करून दिले.
कोणतीही शासकीय वास्तू तयार झाल्यानंतर राजकीय मंडळीची त्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याची लगबग लागते. जो तो त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र या प्रसाधन गृहाची वास्तू बांधून तयार झाल्यानंतरही या वास्तूचे लोकार्पण कोणत्याही राजकीय मंडळीला आठवले नाही ही एक शोकांतिका म्हणण्यास वावगे ठरणार नाही. मात्र या ठिकाणी जनतेची सतची वर्दळ यात महिला भगिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येवून तृतीयपंथी भगिनीला प्राचारन करून या प्रसाधन गृहाचे लोकार्पण त्यांचे हस्ते केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे. हा लोकार्पण सध्या चांगलाच चर्चेत आला असला तरी या ठिकाणी येणार जाणार नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
