किन्ही वळगी येथे रेशमी उद्योग कार्यशाळा
————————————
किन्ही(वळगी)- दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील अमोल दुर्गे यांच्या शेतामध्ये. आज जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय व तहसिल कार्यालय दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम उद्योग कार्य शाळा आयोजन करण्यात आले होते यामध्ये नेर.बाभुळगाव.आर्णि.दारव्हा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.महा रेशीम अभियान दि १०/११/२०२१ ते ३०/११/२०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात आले होते.सदर अभियानांतर्गत गावातील बारा शेतकरी यांनी रेशीम उद्योगा करिता सभासद नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी मा अमोल येडगे साहेब यांनी दि २९/१२ २०२१ रोजी किन्ही वळगी येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कथले यांनी रेशीम उद्योगास भेट दिली असता.जिल्हाधिकारी साहेब यांनी या समाधान व्यक्त केले शेतकरयांना उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणुन शेतकरी यांनी रेशीम उद्योग शेतकर्याने हा फायदा आहे व
किन्ही वळगी गावातील पन्नास शेतकरयांनी रेशीम उद्योग करवा असे सांगितले
जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय अंतर्गत नविन शेतकरीची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेशीत केले.त्या नुसार सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळे मध्ये तुती नर्सरी लागवडीचे पुर्ण प्रशिक्षण देण्यात आले.सदर कार्यशाळेत प्रमुख श्री खाटीक साहेब नायब तहसिलदार दारव्हा.कृषि सहाय्यक ओळंबे .ग्राम सचिव गायकवाड. सरपंच संतोष सुरस्कार.सचिन डकरे माजी उपसरपंच. वसंत ठाकरे ग्रा प सदस्य.प्रविन जाधव ग्रा प सदस्य. गणेश चतुर सामाजिक कार्यकर्ते.सदर एक दिवसीय रेशीम उद्योग कार्यशाळा साठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात होत यावेळी पि.एम.चौगुले रेशीम विकास अधिकारी तसेच पि.जी.बावणे समुह प्रमुख.श्री पि.पि.बिजवे साहेब समुह प्रमुख जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय यवतमाळ . यांनी शेतकरयांना रेशीम उद्योग संदर्भात तांत्रिक माहिती दिली असून एक दिवसीय कार्यशाळे मध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन रेशीम उद्योग यांची माहिती घेतली आहे.
शेतकरी मध्येसुरे धुमाळे. निलेश आडे.किरण दुर्गे.उकंडा आडे.दिनेश कथले.तुषार दायेदार. महादेव जाधव.अक्षय दायदार अनिरुद्ध सरताबे.कैलास चौधरी रेशीम उद्योग एक दिवसीय कार्यशाळा आयोजित व यशस्वीतेसाठी अमोल दुर्गे.किरण दुर्गे यांनी मोठे परीश्रम घेतले. कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
