Home यवतमाळ सुसंस्कार विद्या मंदिर येथे कोवीड लसीकरण मोहिम

सुसंस्कार विद्या मंदिर येथे कोवीड लसीकरण मोहिम

8

सुसंस्कार विद्या मंदिर येथे कोवीड लसीकरण मोहिम

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर येथे वय वर्षे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोवीड लसीकरण करण्यात आले. यावेळी शासनामार्फत अर्बन हेल्थ सेंटर आठवडी बाजार यवतमाळ येथील आरोग्य विभागाची चमू आलेली होती त्यांच्याद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उषा कोचे मॅम यांची उपस्थिती लाभली.
दिनांक 3 जानेवारी 2022 च्या शासन नियमानुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत सुसंस्कार विद्यामंदिर येथील इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मुलांचे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सुसंस्कार विद्या मंदिर येथील 80 विद्यार्थ्यांचे कोवॅक्सिन या लसीचा प्रथम डोस देण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर 30 मिनिटे शिक्षकांच्या देखरेखीत ठेवण्यात आले.याप्रसंगी लस घेण्याकरिता विद्यार्थांमध्ये उत्साह दिसुन येत होता,
याप्रसंगी शाळेचे सचिव श्री.के. संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका उषा कोचे मॅडम यांनी लसीकरणा नंतर घ्याव्या लागणाऱ्या काळजी संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आवश्यक त्या सुचनांचे पालन करण्यास सांगितले, अशाप्रकारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्म कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण कार्यक्रम मोहीम यशस्वीपणे पार पडला.

Copyright ©