कार्यकारी संपादक राजू चव्हाण
घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत अफलातून कारभार..!
——————————————–
हाकेच्या अंतरावर वरली मटका सुरू
——————————————–
घाटंजी- आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यातील घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये पारदर्शकता असावी ही सर्व सामान्य जनतेची मागणी होती. मात्र अलीकडे रुजू झालेले ठाणेदार यांच्या कडील सर्व अपेक्षा हवेत विरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पोलीस विभाग म्हटलं की प्रत्येकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असते मात्र घाटंजी पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध्य धंद्याला उधाण आले आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वरली मटका सुरू आहे. यात लाखो रुपयाची उलाढाल ठरविलेल्या हप्ता बहादर पोलिसा कडून केल्या जात आहे. याशिवाय पारवा पॉइंट, घोटी पॉइंट, बसस्थानक जवळून अवैध्य वाहतूक जोमात सुरू आहे याला मुक संमती देवून घाटंजी पोलीस स्टेशनचे एक पोलीस कर्मचारी शहरातील एका रोजदाराला घेवून खुलेआम पठाणी वसुली करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेश अवैध्य व्यवसाय विरोधी आदेश असताना घाटंजी पोलीस आर्थिक स्वार्थापोटी या आदेशाला केराची टोपली दाखवत अमाप माया जमवित आहे. या पोलीस स्टेशन मध्ये बाहेरील काही खबरी खुलेआम वावरत असून काही तथा कथित पत्रकार यांचा सुध्दा समावेश आहे. या पोलीस स्टेशन चा जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी सविस्तर व बाब निहाय चौकशी लावून येथिल कारोभार सुरळीत आणावा अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.
