Home यवतमाळ गवळी सेवा फाऊंडेशन “माझी दिनदर्शिका”प्रकाशन सोहळा भांडुप मुंबई येथे उत्साहात संपन्न.

गवळी सेवा फाऊंडेशन “माझी दिनदर्शिका”प्रकाशन सोहळा भांडुप मुंबई येथे उत्साहात संपन्न.

10

गवळी सेवा फाऊंडेशन “माझी दिनदर्शिका”प्रकाशन सोहळा भांडुप मुंबई येथे उत्साहात संपन्न.

मुंबई : गवळी सेवा फाऊंडेशन या गवळी समाज बांधवांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या आणि गवळी समाज बांधवांच्या विकासाचे ध्येय बाळगत एकिकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेचा “माझी दिनदर्शिका २०२२”

प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २ जानेवारी रोजी  भांडुप मुंबई येथील गिता हॉल येथे  मोठया उत्साहात संपन्न झाला.गवळी समाजाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.श्रीकृष्ण पूजन व दिपप्रज्वलन मा. नगरसेवक ठा. म.पा. मा. प्रदीपभाई खाडे, समाजसेवक, मा. विवेकदादा भाटकर, मा.डॉ. कैलास सोनमकर (M.D) सल्लागार वासुदेव घोले , सल्लागार सुरेश ठसाळ  ,समाजसेविका सरिता खेडेकर व मुंबई पूर्व विभाग अध्यक्ष मा.महेश कासार  यांच्या हस्ते करण्यात आले व मान्यवर यांनी उपस्थित समाज बांधव व मित्र परिवार यांना सामाजिक कार्याबद्ल  मार्गदर्शन केले.संस्थेचे संस्थापक मा.दिनेश भोजने यांनी उपस्थितांना दिनदर्शिकेची प्रकाशन निर्मिती उद्देश तसेच संस्थेबद्दल माहिती व सामाजिक कार्याबद्दल माहिती उपस्थित समाज बांधव व मित्र परिवार यांना दिली व आलेल्या सर्व मान्यवर, जाहीरातदार, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका, व समाजबांधव, मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त  तालुका, जिल्हा पदाधिकारी समाज बांधवांना  नियुक्ती पत्रे देवून पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, जिल्हाध्यक्ष पदाधिकारी स्वयंसेवक स्वयंसेविका व गाव पातळीवरील समाज बांधव मित्र परिवार उपस्थित होते.

Copyright ©