Home यवतमाळ जिल्हा परिषदच्या संकुलाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या

जिल्हा परिषदच्या संकुलाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या

10

 संपादक सदानंद जाधव

जिल्हा परिषदच्या संकुलाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या

सामाजिक कार्यकर्ते सदानंद आठवले यांची मागणी

भारताच्या सर्वप्रथम महिला शिक्षिका तथा स्त्री उद्धारक सावित्रीबाई फुले यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्या कार्याला उजाळा म्हणून जिल्हा परिषद संकुलाला त्यांचे नाव देणे हिताचे होईल.म्हणून संबंधित विभागाने पुढाकार घेऊन जि.प.संकुलाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे व त्यांची मूर्ती बसवावी अशी मागणी सदानंद आठवले यांनी केली आहे.

ज्योतिराव फूले यांना स्त्री शिक्षणासंदर्भात कमालीची तळमळ होती. आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सर्वात आधी शिक्षणाचे धडे देऊन त्यांनी सक्षम बनविले. सावित्रीबाई फुले चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता चौकटी बाहेर पडून राज्यातील मुलींना शिक्षित करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांना शेण,दगडाचा मारा सहन केला. मात्र सावित्रीबाई फुले यांनी सर्व हालअपेष्टा सहन करत स्त्री जातीला अखेर शिक्षित केले.त्याची फलश्रुती म्हणून आजची स्त्री सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव जिल्हा परिषद संकुलाला देणे सर्वथा उचित असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सदानंद आठवले यांनी सांगितले.

Copyright ©