तालुका प्रतिनिधी सय्यद अक्रम
मोकाट जनावरांचा आवर घालता का? आर्णी करांची मागणी
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुसाट असून भररस्त्यात मोकाट जनावरे टोळ्या करून बसत आहे ह्याकडे नगरपरिषद प्रशासकाचे दुर्लक्ष आहे मोकाट जनावरांमुळे अपघाताला आमंत्रण असून या जनावरांना आळा घालतील का? असा प्रश्न नागरिकांना होत आहे
नगरपरिषदेचे नगरसेवक अधिकारी तसेच कर्मचारी शहरातील मुख्य रस्त्याने दिवसभर ये-जा करीत असताना हा प्रकार पाहून सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांच्या टोळ्या असून मोकाट जनावरांना रस्त्यावर बसणे वावरणे इत्यादी कारणांमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येत असून किरकोळ अपघात घडण्याची दाट शक्यता टाळता येत नाही तसेच या मोकाट जनावरांमुळे शहरात घाणीचे वातावरण पसरत आहे आणि शहरातील मुख्य माहूर चौक, आंबेडकर चौक या चौकात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा शहरातील मोकाट जनावरांच्या अडचणीमुळे होणारे अपघात वा अन्य गोष्टींची नुकसानीची जबाबदारी नगरपरिषदेने घेऊन त्याबाबत अधिकृत आदेश काढावे कारण मोकाट जनावरे व इतर जनावरे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी कायद्याने नगर प्रशासनाची असल्यामुळे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार साहेब यांनी प्रशासनामार्फत आवश्यक कारवाई व व्यवस्था करून शहरातील मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा व जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी आर आर्णी वासियांची मागणी आहे कृपया याकडे महोदय मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा जनतेची आहे.
