Home यवतमाळ नगर परिषदेच्या लेखापाल विभागाच्या हलगर्जीपणामुळे निखिल ढुरके उपदानापासून वंचित

नगर परिषदेच्या लेखापाल विभागाच्या हलगर्जीपणामुळे निखिल ढुरके उपदानापासून वंचित

11

 
वणी तालुका प्रनिधिनी:- निलेश अ. चौधरी

नगर परिषदेच्या लेखापाल विभागाच्या हलगर्जीपणामुळे निखिल ढुरके उपदानापासून वंचित

नगर परिषदेमध्ये मागील कित्येक वर्षापासुन निखिल धर्मा ढुरके यांचे वडिल सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु धर्मा ढुरके यांचा ९-१२-२०१८ रोजी त्यांचा अल्पशा आजाराने मृत्यु झाला. परिस्थिती हलाकीची असल्यामुळे ,उपदान मिळणेबाबत वेळोवेळी निखिल ढुरके यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केले. परंतु त्यांना नगर परिषदेच्या लेखापाल विभागाकडून उडवा उडवीची उत्तर मिळाली.आम्हाला सातवा वेतन लागु झाल्यावर, आम्ही तुम्हाला उपदान देऊ !अशा प्रकारची उर्मट भाषा लेखापाल विभागाकडून वापरण्यात येत असल्याचा आरोप निखिल ढुरके यांनी केला आहे.
आपला हक्क मिळवण्यासाठी न्याय कुणाला मागाचा?? असा प्रश्न निखिल ढुरके यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा पवित्रा अवलंबविला असुन , गुरुवार (23डिसें.) पासुन नगरपरिषदेच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जो पर्यंत समाधानकारक उत्तर पालिका प्रशासनाकडून मिळणार नाही .तो पर्यंत आमरण उपोषण सुरु राहील असे दै. नवराष्ट्रशी बोलतांना निखिल ढुरके यांनी सांगितले.

Copyright ©