वणी तालुका प्रतिनिधि:- निलेश अ. चौधरी
हेल्पिंग हॅन्ड गृपच्या वतीने गरजुंना जीवनावश्यक वस्तुचे वाटप
तालुक्यातील लालगुडा येथील बिलिवर्स ईस्टर्न चर्च येथे हेल्पिंग हॅन्ड गृपच्या वतिने गरजवंतांना ब्लँकेट , जाॅकेट , शिलाई मशिन ,अपंग व्यक्तींसाठी तिन चाकी सायकल या सारख्या आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मा. आमदार वामनराव कासावार तर प्रमुख पाहुने म्हणून ईजार शेख जिल्हा सरचिटणीस, राजाभाऊ पाथ्रटकर ,डाॅ. महेंद्र लोढा ,निलेश परगंटीवार , सुधीर पेटकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रोजेक्ट प्रेसिडेंट कृष्णमुर्ती कुळकर्णी बिलिवर्स ईस्टर्न चर्च लालगुडा यांनी केले . यावेळी बिलिवर्स ईस्टर्न चर्चचे सदस्य गंगा मंगलपवार मॅडम ,पवन शंकावार सह मोठ्या संख्येत बिलिवर्स ईस्टर्न चर्चचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
