Home यवतमाळ गाडगेबाबा पुण्यतिथीला ग्रामस्थांचा अभुतपूर्व प्रतिसाद

गाडगेबाबा पुण्यतिथीला ग्रामस्थांचा अभुतपूर्व प्रतिसाद

15

गाडगेबाबा पुण्यतिथीला ग्रामस्थांचा अभुतपूर्व प्रतिसाद

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ ( का.). येथील ग्रामस्थांच्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी अभूतपूर्व प्रतिसादाने पार पडली.
सकाळी प्रभातफेरी काढून संपूर्ण गावात ग्रामसफाई करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गाडगेबाबांच्या प्रतिमेसह अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. गावातील रस्ते स्वच्छ करून , सडे टाकून रांगोळ्यांनी सजले होते. प्रत्येक दारासमोर गाडगेबाबा यांच्या पोशाखातील बाबाला महिला -पुरूष पूजत होते तसेच प्रतिमेचे पूजन करीत होते. ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला ‘ या नामजपाने अख्खे गाव दुमदुमून निघाले. प्रसन्न व भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या मिरवणुकीत गुरुदेव सेवा मंडळासह, गावातील तेवीस महिला बचत गट, वारकरी मंडळी, सम्यक समबोधी मंडळ, पंचशील मंडळ, बिरसा सेवा मंडळ, संत भिमा भोई समाज मंडळ, अण्णाभाऊ साठे मंडळ, महिला भजनी मंडळ, संताजी जगनाडे तैलिक मंडळ, हॉटेल, किराणा दुकानदार संघ, बळीराजा शेतकरी मंडळ , संत सेवालाल समाज मंडळ यांच्यासह हजारो स्त्री-पुरुष मिरवणुकीत सहभागी होते.
कांताताई संजय कांबळे, सभापती पं.स.यवतमाळ, प्रतिभाताई पुरुषोत्तम अवझाडे, सरपंच, चंदाताई मेश्राम, डॉ.माणिक मानकर, संजय कांबळे, डॉ अनंतकुमार सूर्यकार, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, विजय ढोके, गणेश सोनोने, नारायण सूर्यकार,विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, हिरामण मडावी, हिरामण बनकर, मोतीराम जाधव, गिरीधर भगत, राजू नागदेवते, शंकर पोहोरकर ,राधाताई मोडले, कांताताई मोडले यांनी अथक परिश्रम घेतले.
समाजामध्ये समानता व समता प्रस्थापित होणे काळाची गरज आहे . हीच शिकवण गाडगेबाबांनी दिली. असे प्रसंगोचित विधान डॉ. माणिक मानकर यांनी केले.
डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तसेच संजय कांबळे यांनी समस्त मंडळाचे व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Copyright ©