16

तेली समाजाच्या आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा पालखी रथ 23 डिसेंबरला यवतमाळ येथे येणार

यतवमाळ – तैलीक समाजाचे आराध्य दैवत श्री सताजी जगनाडे महाराज यांची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. 23 डिसेंबर 2021 रोजी गुरूवारला सायंकाळी 6.00 वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमान पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील. 24 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी पालखी व प्रतिमेचे अभिषेक पुजन होईल. त्यानंतर प्रातिकतेचे नेते खा. रामदास तडस व अन्यनेते संताजी मंदिरात आयोजित सभेत समाज बांधवांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रातीक तैलिक महासभेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दिलीप बारडे या पत्रकार परिषदेत केली आहे. दि. 24 डिसेंबरला प्रांतिक नेत्यांच्या स्वागत सभेत खा. रामदास तडस कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, युवा अध्यक्ष संदिप भैया क्षिरसागर, सेवा आघाडी सुभाष पन्हाळे, उपाध्यक्ष बापू विभूते, ठाणे विभाग अध्यक्ष सुनिल चौधरी, युवा आघाडी महासचिव नरेंद्रभाऊ चौधरी हे प्रदेश कार्यकारीनी नेते उपस्थित राहतील. पालकीरच यात्रेच्या निमित्य यवतमाळ येथील तैलिक समाजाचे मान्यवर सेवेकरी व नेत्यांना शुभेच्छा देतील. त्यानंतर 10 वाजता महाप्रसाद घेवून पालखी रथ यात्रा श्री क्षेत्र कळंब मागनि प्रस्थान करील पालखीला निरोप देण्यासाठी युवकाची स्कुटर रैली, महिला संघटनेच्या वतीने सामुहीक आरती, आणि भजनी, दिंडीव्दारे निरोप देण्यात येईल. कळंब येथे पालखी रथ यात्रेचे व अतिथिचे स्वागत तैलिक युवाकार्यकर्ता रंगरावजी लांजेवार व प्रशांत डेहनकर करतील. व कळंब येथे पालखीचा अल्पविधाम असेल तसेच कळंब, राळेगाव, याभूळगाव तालुक्यातील समाज बांधव कळ येथे पालखी दर्शन घेतील. देवळीला जाईल.
पालखी रथ यात्रा वर्धा जिल्हयात पालखीने आराध्य दैवताच्या पालकाचे दर्शन तेली बंधु भगवडीस संताजी हाराजाचा इतिहास तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने प्रारंभ केलेल्या नविन अपन्समाजाची जनगणना व्हावी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकावर होणारा अन्याय दूर हावा त्या दृष्टीने तैलिक समाजाच्या शिखर संस्थेने जोो हे अभियान सुरू करून ही रथयात्रा आयोजित केली आहे हे विशेष.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात ही पालखीरथ यात्रा समाज जागृति, सामाजिक सुधारणा व संताजी दर्शनार्थ भ्रमंती करीत असून यवतमाळ जिल्हयातील महाप्रसाद पालखी रच दर्शन, व नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रांतिक महासभेचे अध्यक्ष ड. दिलीपजी बरडे यांनी केले आहे. पालकीरथ यात्रा स्वागत स्वागत सभा व निरोप समारंभासाठी म. प्रा. तैलिक महासभा जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी सर्वश्री विलास गिरोलकर, विजय बिजुलकर, रमेश जयसिंगपुरे, संजय साहू, सुनिल गुलवाडे, सुमन साखरकर, डॉ. रूपाली गिरोलकर चेतन भुराणे सुरेश झोपौटे संतोष डोमाळे हे कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत व समाज बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केला आहे.

Copyright ©