कार्यकारी संपादक राजू चव्हाण
शिक्षक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर
———————————————
घाटंजी-दिनांक १९डिसेंबर ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ६६६९/३९ ची आमसभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ सदस्य एन.टी. मेश्राम होते.सभेच्या सुरुवातीला स्व.गणेश गाउत्रे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेमध्ये शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश उदार व निरीक्षक भूपेंद्र गोहणे यांचे उपस्थितीत घाटंजी तालुका कार्यकारणी ची निवड करण्यात आली.तालुकाध्यक्ष म्हणून दिपक महाकुलकर तर सचिव पदी संजय पडलवार यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदी चंद्रकांत मुनेश्वर , कोषाध्यक्ष म्हणून अंकुश सलाम तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजेश उदार व प्रवीण मडावी यांची निवड करण्यातआली.तालुका उपाध्यक्ष पदी,प्रशांत भेदूरकर,मनोज गवळी,संदीप राऊत,नंदकुमार बुरबुरे व सहसचिव म्हणून विलास चिकराम , राजेंद्र गिरी तर सल्लागार म्हणून एन .टी. मेश्राम,देवेंद्र कावळे,वसंत जाधव आणि संघटक पदी अनिल मस्के, नितीन मुद्देलवार ,सी.के.आडे,भास्कर वेट्टी यांची निवड करण्यात आली.प्रसिद्धी प्रमुख खालीक शेख तर प्रकाशक म्हणून अजय मंगाम व महिला प्रतिनिधी म्हणून प्रतिभा किणगे यांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त कार्यकारिणीचे नियुक्ती पत्र देवून अभिनंदन करण्यात आले. सभेला शिक्षक संघाचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
