Home यवतमाळ उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांच्या , शिक्षण क्षेत्रातील सेवेची राज्य स्थराव...

उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांच्या , शिक्षण क्षेत्रातील सेवेची राज्य स्थराव दखल

10

 वणी तालुका प्रतिनिधी  निलेश  चौधरी

उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांच्या , शिक्षण क्षेत्रातील सेवेची राज्य स्थराव दखल

अशोक चौधरी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत शिक्षण विभाग उपसंचालक अनिल साळवे यांच्या हस्ते सत्कार..

तालुक्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी संपुर्ण जिल्ह्यासह,महाराष्ट्रात सुध्दा शिक्षकांच्या प्रश्नाला वाच्या फोडण्याचे काम केला असुन ,प्रत्येक शिक्षकांच्या न्यायाच्या लढाईत खंबीर पणे पाठिंबा दिला आहे. मागील तिन दशकापासून शिक्षकांचा बदल्यांचा प्रश्न ऐरणीवर येऊन असतांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा राज्य उपाध्यक्ष अशोक चौधरी यांनी उच्च न्यायालयात जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. ह्याच कामाची दखल घेत शनिवार (१८डिसें.) रोजी औरंगाबाद येथे आयोजित झालेल्या ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक राज्य अधिवेशनात औरंगाबाद विभागाचे उपसंचालक अनिल साळवे यांच्या हस्ते शाल ,श्रीफल व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्यांच्या कार्याबद्दल “युवा पिढितील शिक्षकांना एक आदर्श घ्यावा असे आपल्या भाषणात बोलतांना उपसंचालक अनिल साळवे यांनी म्हटले ” उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी मार्गी लावलेल्या शिक्षकांच्या समस्या ,उपसंचालक अनिल साळवे ह्यांच्या भाषणातून विषेद होताच ,संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षांव होत आहे . या राज्य स्थरीय उच्च श्रेणी संमेलनाला प्रमुख अथिती म्हणून दिनकरजी टेमकर साहेब (शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे) व अनिलजी सावळे साहेब (औरंगाबाद विभाग उपसंचालक) यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी श्रीराम परबत (राज्य नेते) ,संभाजी पाटील ,भाऊसाहेब निकम ,माधव सावंतसह , सानप सर व दोडके सर तथा शेकडोंच्या संख्येने राज्यातील शिक्षण मंडळी उपस्थित होते.

Copyright ©