Home यवतमाळ भगवान श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव तथा पंचावतार उपहार संपन्न

भगवान श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव तथा पंचावतार उपहार संपन्न

9

भगवान श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव तथा पंचावतार उपहार संपन्न

जवळा (खांड) येथे महानुभाव पंथीय भगवान श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव तथा पंचावतार उपहार कार्यक्रम संपन्न झाला यात प्रथम श्री दत्तप्रभुस मंगल स्नान, उटी,विडा अवसर,आरती, श्रीमद् भागवत गितापाठ, देवपुजा प्रसाद वंदन,आणि हिवरी हेटी येथुन श्री दत्त प्रभूच्या मूर्तीची भव्य शोभा यात्रा जवळा( खांड )येथे गावामधून नेण्यात आली ठीक ठिकाणी सद्भक्तानी पूजन केले या वेळी लेझिम मंडळ भजन मंडळ सहभागी होते तर ज्ञानसत्र घेण्यात आले या वेळी सभेचे अध्यक्ष प. पु.महंत आचार्य श्री रेवेराज बाबा दिल्ली,कार्याध्यक्ष प. पू. म.श्री नानेराज बाबा मांजरोद, व्याअख्यान मार्तंड प.पू.म.अंकुळनेरकर वडनेर भुजंग हे होते तर संचालन सार्थकमुनी जावळेदादा यांनी केले या कार्यक्रमास माजी आमदार बाळासाहेब मुंगिनवार,विजयभाऊ मोघे,सरपंच, सौ.प्रणिताताई आडे सचिव,चंद्रशेखर पिलावन प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन विजयराजदादा पंजाबी,सुनंदाआई मेहकरकर यांनी केले.

Copyright ©