सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान
डोळे तपासणी शिबिराचा 700 च्या वर रुग्णांनी घेतला लाभ.डोळे तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद.
डोळे तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले.
शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था, कृष्णनगर (ता. आर्णी ) द्वारा सावळी सदोबा येथे दि. 18 डिसेंबर शनिवार रोजी मोफत डोळ्यांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिरात सावळी सदोबा परिसरातील जवळपास 700 च्यावर रुग्णांनी डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी करून घेतली , तपासणीत 125 रुग्णांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले.
या 125 रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करून आणू असे आयोजक वीरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे , नुनेश्वर गोविंदा आडे आणि मुबारक तंवर यांनी यावेळी सांगितले.
रुग्णांना त्यांच्या घरापासून यवतमाळला नेण्याची व डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी आयोजकांनी घेतलेली आहे.
डोळे तपासणी शिबिरात शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र तज्ञ डॉ. उमेर तयबानी , डॉ. गिरीराज होडगिरे , डॉ. निलेश आंबेकर , डॉ. शुभम बाकमवार , डॉ. सोहम गायधने यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली आरणीचे नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. रामभाऊ वाघाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिबिरात आलेल्या बहुतेक रुग्णांना डोळ्यांचे औषध, गोळ्या मोफत देण्यात आल्या असून
शिबिरा दरम्यान येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी मोफत मास व सॅनिटायझर ची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षापासून सावळी सदोबा परिसरात मोफत डोळे तपासणी शिबिर झाले नव्हते.
आजच्या मोफत डोळे तपासणी शिबिरामुळे अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले,
या डोळे तपासणी शिबिराच्या निमित्ताने रूग्णांनी आयोजकांचे आभार मानले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी किसन नाईक , उमाकांत आडे , सनम तंवर , ईंदरसिंग चव्हाण , वसंता नारायण जाधव, दुलसिंग नाईक चव्हाण ,ईंदल महाराज, संतोष पवार, मधुकर राठोड, विजय राठोड , रवी राठोड, अविनाश चव्हाण, संदेश तोवर ,मोहन चव्हाण, शंकर जाधव , विरू राठोड, अक्षय राठोड , राजे जाधव, अमोल जाधव, माॅंटी जाधव, चेतन चव्हाण
यांनी मोलांचे सहकार्य केले.
