Home यवतमाळ रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, कोठा या गावात महिला सक्षमीकरण कार्यक्रम…

रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, कोठा या गावात महिला सक्षमीकरण कार्यक्रम…

10

रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, कोठा या गावात महिला सक्षमीकरण कार्यक्रम…

कलंब तालुक्यातील कोठा या गावात रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, भूमित्र प्रोडूसर कंपनी व उमेद च्या सहकार्याने महिला सक्षमीकरण कार्यक्रम घेण्यात आला. महिला आर्थिक दृष्ठी सक्षम व्हाव्या, तसेच त्यांनी स्वबळावर व्यवसायाची निर्मिती करून इतरांना ही प्रेरणा मिळावी या करीता सदर कार्यक्रम घेण्यात आला. या मुळे महिलांच्या आत्मविश्वास वाढीकरिता नक्कीच मदत होईल. याकरीता गावपातळीवर रिलायन्स फाउंडेशन, उमेद, अफार्म या संस्था कार्यरत आहेत.
या कार्यक्रमात रिलायन्स फाउंडेशन च्या मार्गदर्शनातून सूरू झालेल्या व्यवसाय चे स्टॉल लावण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उमेद च्या प्रतिभा बावनकर मॅडम, प्रशांत बुरबुडे सर, नितीन गायकवाड सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन अफार्म चे सागर तायडे सर, अमित म्हेत्रे सर, ग्रामपंचायत कोठा चे ग्रामसेवक सोळंके सर, सदस्य सुशीलाताई चाफले, ग्रामपंचायत सातेफळ च्या सरपंच पूजाताई खोडे उपस्थित होते. त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन चे टीम लीडर संदीप वायाळ सर, रूपा मॅडम, CRP टीम व भुमित्र टीम उपस्थित होते..

Copyright ©