जय भवानी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा
जय भवानी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा १७ ते १८ डिसेंबर ला आयोजित करण्यात येणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन १७ डिसेंबर रोजी नाका पारडी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन मा. बबनभाऊ चेके माजी उपसरपंच हिवरी, सुरजभाऊ मनवर सामाजिक कार्यकर्ते भाम राजा, विजयभाऊ शहारे, सतीशभाऊ राऊत सदस्य ग्रामपंचायत नाका पारडी, संतोष भाऊ गुप्ता माजी तंटा मुक्ती अध्यक्ष नाका पारडी, किसन भाऊ ठाकरे हिवरी, बाबूभाऊ बावणे , हरिभाऊ पुसनाके, पंकज भाऊ तिवारी,व समस्त गावकरी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ८५ हजार रुपयांचे रोख व १५ हजार रुपयाचे इतर पारितोषिक विजेते संघास देण्यात येणार आहे या स्पर्धसाठी मंडळाचे कार्तिक शुक्ला, कश्यप भवरे, सुरज सोनवणे, आकाश आडे, अजय शेंदरे, आकाश सरवरे,पंकज घुटके,संजय आडे, विजय चौधरी, नितेश चायरे ,ओम किनाके हे विशेष परिश्रम करीत आहे.
