अमोलकचंदमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा-
विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे वतीने ‘ आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस ‘ आभासी ( ऑनलाईन ) पद्धतीने साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते , प्रख्यात कायदेतज्ज्ञ डॉ. संदीप नगराळे , अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळ यांनी अभ्यासपूर्ण वक्तव्य व मार्गदर्शन केले. अल्पसंख्याक असलेल्या लोकांचे कोणत्याच प्रकारे हनन होणार नाही .याची राष्ट्र व राज्यांना संयुक्त राष्ट्र संघाने जाणीव करून दिली. राजकीय, सामाजिक, धार्मिक, वांशिक , भाषिक अधिकारापासून अल्पसंख्याकांना कोणीही रोखू नये. भारतीय संविधानाने हे अधिकार संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यापूर्वीच बहाल केले आहे. सहा अल्पसंख्याक. धर्मियांचे कार्य हे देश हिताकरिता स्पृहणीय आहे. असे प्रसंगोचित विधान डॉ . संदीप नगराळे यांनी केले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. गणेश खंडेराव यांनी करून दिला. डॉ. अनंत सूर्यकार , कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. डॉ. माधुरी भादे, महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना , प्रा. डॉ. प्रशांत मुस्कावार , डॉ. प्रबोधनकार मॅडम, डॉ. अंजू फूलझेले मॅडम प्रसंगी उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य स्वयंसेवक आभासी कार्यक्रमास हजर होते. शेवटी प्रा. सचिन वानखेडे, सह- कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी आभार मानले.
