Home यवतमाळ जि.प.प्रा.शाळा चिचघाट येथे शालेय व्यवस्थापन समिती गठित 

जि.प.प्रा.शाळा चिचघाट येथे शालेय व्यवस्थापन समिती गठित 

11

जि.प.प्रा.शाळा चिचघाट येथे शालेय व्यवस्थापन समिती गठित 

आज दिनांक 18/12/2021 रोजी जि. प. प्रा.शाळा, चिचघाट येथे नविन शालेय व्यवस्थापन समिती ची स्थापना करण्यात आली.इयत्ता पहिली ते पाचवी- तील पालकामधून सदस्याची निवड करण्यात आली.श्री.संदीप मारोती जाधव यांची अध्यक्ष तर श्री.उमेश हागवने यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तसेच सौ.सुलोचना शंकर मेश्राम महिला प्रतिनिधी ,श्री.अमोल पवार,श्री.रघुनाथ राठोड आणि श्री. संतोष पवार…यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .अध्यक्ष श्री.संदीप राठोड यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिल उत्तरवार सर यांनी केले.इतर सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री. दिपक उमरे उपसरपंच,श्री.विरेंद्र राठोड पोलीस पाटील,श्री,योगेश राठोड,श्री.निलेश लडके, श्री.संतोष उमरे यांनी केले.श्रीमती माया हलवले मॅडमनी शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य आणि जबाबदारी इत्यादींची माहिती देऊन नवोदित सर्व सदस्यांचे स्वागत करून आभार मानले. जि. प. प्रा.शाळा. चिचघाट चे सर्व शिक्षिका तसेच सर्व पालक यांच्या उपस्थित नवीन शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली .

Copyright ©