तालुका प्रतिनिधी सय्यद अक्रम
विद्यार्थ्यांचे आर्णीत शासकीय अभ्यासिकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शासकीय स्तरावर आर्णीमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका(ग्रंथालय)उभारण्यात यावे,यासाठी 18डिसेंबर शनिवारला “टीम ऑफ द यंग सोशल वर्क” चे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तहसीलदार आर्णी मार्फत दिले आहे.
आर्णी मध्ये शासकीय वाचनालय,ग्रंथालय किंवा अभ्यासिका एकही आतापर्यंत झालेली नसून,विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही एक फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.तरीही आर्णी तालुक्यातील विद्यार्थी जमेल त्या परिस्थितीत अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करतात.नुकत्याच लागलेल्या स्पर्धा परीक्षा निकालात आर्णी तालुका व शहरातील 3विद्यार्थी गुणक्रमांक पटकावून उच्चपदासाठी गुणवत्ता यादीत आले आहे. मात्र अभ्यासात हुशार व परिस्थितीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे यामध्ये नुकसान होत आहे.यासाठी “टीम ऑफ द यंग सोशल वर्क” च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय स्तरावर अभ्यासिकेसाठी जागा,इमारत,फर्निचर,स्पर्धा परीक्षेची पुस्तके व ईतर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून तालुक्यातील होतकरू विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे होईल व देशाला या अभ्यासिकेतून चांगले अधिकारी मिळतील.यावेळी विद्यार्थी तृप्ती राऊत,नदीम शेख,गायत्री कडव, सरस्वती अग्रवाल,सीमा शेख,ऐश्वर्या चव्हाण, जानकी अरणकर, कोमल राऊत,स्नेहा मांगुळकर,जोती मिठे, आकाश काळे,साहिल फानन,शोएब शेख,पलाश कुबडे,अमर्दिप गावंडे,मनीष गावंडे,गौरव,इम्रान शेख इत्यादी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेसाठी आर्णी ठाणेदारांचा सकारात्मक प्रतिसादआर्णी चे ठाणेदार पितांबर जाधव यांनाही विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन अभ्यासिकेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यावेळी ठाणेदारांनी विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेविषयी उत्साह वाढवत जमेल तशी मदत करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. पोलीस स्टेशन मध्ये उभारण्यात आलेल्या हॉल चे इमारतीच्या वर, लोकवर्गणीतून अभ्यासिका तयार करता येईल,असा सकारात्मक प्रतिसाद विद्यार्थ्यांना ठाणेदारांनी दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व टिचिंग सुध्दा आपण करू असेही ठाणेदारांनी यावेळी सांगितले.
