आक्रोश मोर्चात उसळला जनसागर
3 डिसेंबर रोजी काळी दौ. येथे घडलेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबाला योग्य तो न्याय मिळण्याच्या दृष्टीने गोर सेना, गोरा आर्मी, गोरसिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 डिसेंबर रोजी पुसद येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गोर सेना, गोर आर्मी, गोर्सिकवाडी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आक्रोश मोर्चा मध्ये जनसागर उसळला होता.
इंजिनीरिंग कॉलेज जवळील वसंत क्या उद्यान चौका मधून निघालेल्या आक्रोश मोर्चा मधील जनसागर पाहण्यास रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.
एकच लाल सेवालाल च्या जयघोषात मोर्चाकरांनी हमरस्त्यावरून महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्टँड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मुखरे चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चा वसंतराव नाईक चौकांमध्ये दाखला झाला.
वसंतराव नाईक चौकांमध्ये जणू मोर्चे करांचा जनसागर उसळला होता असे दृश्य पाहावयास मिळाले. पुसद नगरीमध्ये विशिष्ट एका समाजाचा मोरच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर उसळून निघालेला कधी पाहण्यात आला नाही अशा जनभावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
आक्रोश मोर्चा मध्ये उसळलेला जनसागर पाहता पोलीस प्रशासनाने संपूर्ण पुसद बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चा मध्ये येणाऱ्या मोर्चे करांची संख्याबळ लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता. यामध्ये 1500 पोलीस अंमलदार, 300 अधिकारी, आर सी पी, क्यू आर टी, टास्क फोर्स आदींचा समावेश होता. पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांचे मार्फत अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ ही पुरविण्यात आले होते. असे पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
याव्यतिरिक्त एस आर पी एफ च्या तीन कंपन्या, अमरावती परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामधील 600 कर्मचारी 120 अधिकारी, तसेच परीक्षेत्राच्या बाहेरील औरंगाबाद शहर, बीड, वर्धा, सीआयडी, हायवे पोलीस असा 400 अमलदार व 80 अधिकाऱ्यांचा फौजफाटा पुरविण्यात आला होता.
आक्रोश मोर्चा मध्ये काही अनुचित घटना घडू नये म्हणून 2500 पोलीस अमलदार 450 अधिकारी तैनात करण्यात आले होते. असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
एकच लाल जय सेवालाल च्या जय घोषात पुसद नगरी दुमदुमत होती. गोर सेनेचे प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी मोर्चाला संबोधित करताना पिडीत कुटुंबाला एका महिन्याच्या आत योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जर तसे झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला.
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकामधील आक्रोश मोर्चाचे स्थळी येऊन मोर्चे करांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. शासना चे प्रतिबंधित आदेश आला न जुमानता उसळलेल्या धाडस युक्त जनसागराचे सर्वच जाती-धर्माचे नागरिकाकडून कौतुक केल्या जात आहे. कोणत्याही जाती-धर्माचे नागरिकावर समाजकंटकांकडून होणाऱ्या कृत्यास ह्या आक्रोश मोर्चा चे माध्यमातून जराब असल्याची जनभावना पुसद मधील सर्व सामान्य नागरीका कडून व्यक्त केल्या जात आहे
जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या नेतृवात तगडा बदोबस्त लावण्यात आला होता
