Home यवतमाळ लिंगायत महोत्सव २०२१ चे आयोजन

लिंगायत महोत्सव २०२१ चे आयोजन

13

लिंगायत महोत्सव २०२१ चे आयोजन

बसव क्लब, वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान,लिंगायत महिला मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजीत लिंगायत महोत्सव
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा रविवार दि.१९ डिंसेबरला महात्मा बसवेश्वर भवन,येथे आयोजीत करण्यात येत आहे, यामध्ये लिंगायत समाजातील लहान मुले,समाज बांधव भगिनीनींच्या कलागुणांना वाव मिळणे करता मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा डिश डेकोरेशन स्पर्धा सोलो डान्स स्पर्धा,तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,
या लिंगायत महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातीलच बंधू भगिनींच्या सुरेल आवाजा मध्ये
संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला वीरशैव मंडळाचे हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ अशोक मेनकुदळे उद्घाटक तसेच अध्यक्ष म्हणून सौ.कल्पना देशमुख लाभले आहे,
दिवसभर चालणाऱ्या या लिंगायत महोत्सवामध्ये,बक्षिसांची रेलचेल राहणार आहे आकर्षक असे प्रथम द्वितीय आणि तृतीय बक्षीस विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे,बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष
डॉ. जयेश हातगांवकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्रसिध्द छातीरोग तज्ञ,
डॉ.अनिकेत भडके,यांची उपस्थिती लाभणार आहे,
लिंगायत महोत्सवातील रांगोळी,चित्रकला,डिश डेकोरेशन,नृत्य स्पर्धेमध्ये कार्यक्रम स्थळी सुध्दा एक तास अगोदर नोंदणी करू शकता.
संगीत संध्ये नंतर स्नेहभोजाना सह कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्या करिता प्रकल्प अधिकारी ह्यांचेशी संपर्क करावा आणि आपण सहकुटूंब लिंगायत महोत्सवाचा आनंद घ्यावा हि विनंती. आयोजंका तर्फे करण्यात आली आहे,

Copyright ©