शिलाचे पालन करत नाही, ते बौद्ध नाहीत – पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो
——————————————-
घाटंजी-
शिलाचे पालन करण्याचा प्रयत्न सर्वच करतात. पण प्रासंगिक ते पाळता येत नाही. याची असंख्य उदाहरणे देऊन प्रसंगी ते पाळणे
अगत्याचे आहे. जपान, थायलंड, ब्रह्मदेश आदी बुद्धिष्ट देशातील
प्रधानमंत्री सुद्धा शिलाचे पालन करतात. त्यांच्याकडे पैशाची, धनाची कमतरता नाही तरी ते 11 ते 5 या वेळेत नित्यनियमाने शिलाचे पालन करतात. मात्र आपल्या देशात बहुतांश लोक पाच शिलाचे सुद्धा पालन करू शकत नाही. जे शिलाचे पालन करू शकत नाही ते बौद्ध नाहीत असे उद्गार पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो अमरावती यांनी काढले. ते पाथरी येथे अखिल भारतीय भिक्खू संघ, फुले – आंबेडकरी साहित्य संसद व पंचशील नवयुवक व महिला मंडळ यांच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना, महावंदना व धम्मदेसना या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले बल, आयुष्य, सुख धन, समाधान हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आचरणात आणल्याने मिळते. परंतु घरात शीलाचे पालन होत नसेल तर त्याला अर्थ नसतो. जे लोक धम्माचे विचार लोकांमध्ये रुजवतात, त्याला धम्म जरी कळला असेल तर केवळ उपदेश करून, विचार करून धम्म रुजत नाही. बाह्य दिखाव्यावरून ते बौध्द वाटत असले तरी ते केवळ पोकळ पंडीतच असतात. मनुष्य शीलवान असतो, सदाचारी असतो. काया वाचा मनाने शीलाचे पालन करणारा असतो तेच लोकं धम्म रुजवू शकतात. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचेही ते प्रसंगी म्हणाले.
मूर्ती प्रतिष्ठापना, महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भदंत सारिपुत्त थेरो यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो होते. तर मंगल उपस्थिती म्हणून पूज्य भदंत श्रीपाद थेरो, पूज्य भदंत राहुल थेरो, पूज्य भन्ते सुबोध, भिक्कू मिलिंद, भिक्कू धम्मप्रकाश, आर्या उरुवीला, आर्या विशाखा आदीसह फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, सुभाष गोडघाटे, सुनील नगराळे, रमेश भगत, महेंद्र देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपासक किशोर भगत व शांतिदूत मुळे यांनी दान म्हणून दिलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना उपस्थित सर्व भिक्खू संघ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच बुद्ध धम्म व संघ वंदना घेण्यात येऊन मग धम्मदेसनेला सुरुवात झाली. प्रसंगी सर्व पूज्य भन्ते यांना दान देण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी सहभाग घेतला.
पूज्य भदंत राहुल थेरो यांनी कोणाशीही वैर करू नका, वैराणी वैर संपत नाही त्याला मैत्रि भावनेनेच जिंकाव लागते. तसेच बुद्ध धम्म व संघा प्रति श्रद्धा असेल तरच आपले जीवन सुखकर होईल असे त्यांनी सांगितले. भदंत सारिपुत्त महाथेरो यांनी बुद्ध धम्म व संघ हे तीन रत्न असून अलग नाही ते एकमेकात सामावलेले आहे. यातून कोणतेही रत्न वेगळे केले तर त्याची किंमत शून्य राहते. त्यामुळे या रत्नाची हानी करणाऱ्याकडून पातक घडते असे सांगून धम्माचे संस्कार रुजवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
मूर्ती प्रतिष्ठापना महा वंदना व धम्मदेशना प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ व भोजनदान ,
तर रात्रीला फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे प्रबोधनकार गायक मानकर बाबू कव्वाल आणि संच यवतमाळ यांचा बुद्ध गीतांचा कार्यक्रम पार पडला. सदर सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील नवयुवक व महिला मंडळ पाथरी येथील भूषण जीवने, सुरज फुललेले, गुड्डू पुनवटकर, वासुदेव गेडाम, महेंद्र भगत, अनिकेत वाळके, कुणाल गोंडाणे, सुमन कांबळे, कुसुम ताकसांडे, संगीता पठाडे, ज्योती फुलझेले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची भूमिका फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत यांनी मांडली. संचालन पूज्य भन्ते श्रीपाद थेरो तर आभार ताकसांडे सर यांनी मानले.
