Home Breaking News विषारी औषध प्राशन करून युवक व युवतीची संयुक्तिक आत्महत्या

विषारी औषध प्राशन करून युवक व युवतीची संयुक्तिक आत्महत्या

16

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

विषारी औषध प्राशन करून युवक व युवतीची संयुक्तिक आत्महत्या
———————————————
दोघेही प्रेमी युगुल असल्याची चर्चा
———————————————
घाटंजी-पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावळी (सदोबा) दुरक्षेत्रा अंतर्गत मध्ये येत असलेल्या आर्णी तालुक्यातील गुढा येथिल गिढाई नावाने परिचित असणाऱ्या टेकडी जवळ २८ वर्षीय युवक विशाल दत्ता आगीरकर रा. राणी धानोरा ता. आर्णी व माहूर तालुक्यातील बोंडगव्हान येथिल१८ वर्षीय युवती पुनम संजय राऊत यांनी दोघांनी मिळून दिनांक १५ डिसेंबरच्या रात्री ते दि.१६ च्या सकाळ दरम्यान संयुक्तिक मृत झाल्याचे आढळून आले आहे. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावल्या जात आहे. या घटनेची माहिती होताच गुढा येथिल पोलीस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलीस स्टेशनला दिली. यावरून आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार गजानन सेजुलकर व पोहेका सुरेश येलपुलवार हे करीत आहेत. या आत्महत्येचे कारण अजून कळले नसले तरी हे प्रेमी युगुल असावे अशी चर्चा होताना ऐकण्यात आहे. नेमकी आत्महत्या का केली असावी याचे कारण तपासाअंती पुढे येईल याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Copyright ©