कार्यकारी संपादक राजू चव्हाण
करमना जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत
——————————————–
अध्यक्ष पदी राजू करपे तर उपाध्यक्ष पदी सोनाली कुळसंगे
——————————————–
घाटंजी- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या करमना जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्ष पदी राजू महादेव करपे तर उपाध्यक्ष म्हणून सोनाली किशोर कुळसंगे तर सचिव म्हणून पदसिद्ध मुख्याध्यापक सुधाकर राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये सदस्य म्हणून गजानन बुरेवार, संतोष कारेवार ग्राम पंचायत सदस्य, हरिभाऊ ठाकरे, अरुण मांडवकर शिक्षण तज्ञ, संतोष कानकाटे, सुनीता चव्हाण, निता चौके, योगिता कारेवार अंगणवाडी सेविका यांची निवड समितीमध्ये करण्यात आली. या निवड प्रक्रियेत शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर राठोड, भाऊ लाकडे, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे सह सर्वत्र पालक वर्गानी उपस्थिती दर्शवून मोलाचे सहकार्य केले. यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन दिले.
