सावळी सदोबा येथे बचत गट कर्ज वाटप मेळावा संपन्न
सावळी सदोबां
दि.१०/१२/२०२१ शुक्रवार ला
बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सावळी सदोबा ता.आर्णि.
सावळी सदोबा व परिसरातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भर होऊन विविध व्यवसायातून आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.या निमित्ताने परिसरातील ४४ जुन्या बचत गटांना ८३ लाख रुपयांचा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, ५४ नुतनीकरण बचत गटांना ३१ मार्च २०२२ पर्यंत कर्ज वाटपाच उदिष्ट पुर्ण होणार, नविन बचत गटांना प्रत्येकी १ लाख असे एकुण ५० लाख ३१ डिसेंबर २०२१ पुर्ण होणार .या कार्यक्रमाच उद्घाटन बॅंक ऑफ महाराष्ट्र चे कर्जवसुली अधिकारी रमेश तिवारी यांनी केले, सोबतच पारव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी हे मार्गदर्शन करताना म्हणाले की,कर्ज फेडण्याची तयारी असेल तरच कर्ज घ्या आणि खरच गरज असेल तर कर्ज घ्या अन्यथा कर्ज घेऊ नका असा मोलाचा सल्ला दिला, महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत बॅंक ऑफ महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असे ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष संजिव कलवले ,उपमहाव्यवस्थापक बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी सांगितले,शाखा व्यवस्थापक संदेश रामटेक यांनी बॅंकेच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, बचत गटातील महिलांनी स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर व्हावे यासाठी लागेल तेव्हा शक्य ती मदत करण्यासाठी मी कधीही तयार आहे असे कळकळीचे आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केले, सोबतच संजिव कलवले उपमहाव्यवस्थापक यांना विनंती केली की बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सावळी सदोबा च स्थलांतर करु नका त्यामुळे बहुसंख्य नागरिक त्रस्त होतील, ग्रामिण जिवन्नोती अभियानाचे तालुका व्यवस्थापक विलास राठोड यांनी सांगितले की सावळी सदोबा शाखा व्यवस्थापक संदेश रामटेक यांच सहकार्य खुप मोलाच आहे तसेच महिलांनी गृहउद्योग, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन,किराणा दुकान इत्यादी व्यवसाय करुन देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी असे सांगितले.
या मेळाव्याच्या निमित्ताने १०० प्रधानमंत्री जिवनज्योती,५० अटल पेंशन योजना,५० प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच उद्दीष्ट साध्य केल,याच ठीकानी कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आल होत या मेळाव्याला सारंग आगरकर तालुका अभियान व्यवस्थापक, संतोष जिरे,प्रभाग समन्वयक,प्रतिक जोशी , यांची उपस्थितीत होती.या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी बॅंक सखी वणिता रामटेके,बॅंक मित्र रविंद्र मनवर,भुवन मुनेश्वर,यश गजघाटे,भागेश गांवडे, सुनिल गवळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वणिता रामटेक यांनी तर आभार प्रदर्शन संतोष जिरे यांनी केले.
