अभ्यंकर कन्या शाळेत महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन!
———————————————
यवतमाळ- स्थानिक अभ्यंकर कन्या शाळेत महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित कार्यक्रमात सर्व प्रथम डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन सौ. पराते मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी श्री. संजय मनवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक भूमिका आपल्या भाषणातून व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. निखिल थारकर यांनी परिश्रम घेतले.
