सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान
सावळी सदोबा येथील बॅक ऑफ महाराष्ट्र स्थालांतरित होऊ नये अशी जनतेची मागणी
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध असलेले सावळी सदोबा असल्याने ब्यांकेची गरज आहे पण काही दिवसांपूर्वी या ठिकाणी विषेश चर्चा ऐकण्यायेते आहे येथील बॅक ऑफ महाराष्ट्र येथुन स्थलांतर करण्यात येत असल्याने या ठिकाणी, असंख्य खातेदार विविध प्रकारच्या योजना मधिल लोकांचें खाते आहे त्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसू नये म्हणून, हि बॅक ऑफ महाराष्ट्र सावळी सदोबा येथे राहणे गरजेचे आहे, बॅक ऑफ महाराष्ट्र सावळी सदोबा येथील कर्मचारी व व्यवस्थापन अधिकारी च्या माध्यमातून अनेक लोकांना त्रास होतो, व्यवसाय करणारे व्यापारी सुध्दा बॅक मधुन बाहेर पडले आहे, त्यामुळे या ठिकाणी पारदर्शक नसल्याची माहिती समोर आली आहे पण बॅक गेले तर या भागातील अनेक लोकांना समस्या निर्माण होईल असे समजून घेणे आवश्यक आहे, या करिता विविध ठिकाणी निवेदन दिले असे समजते, बॅक ऑफ महाराष्ट्र सावळी सदोबा येथे राहणे गरजेची आहे करीता येथील सर्व सामान्य जनता रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे हि ब्यांक जैसे थे च राहू द्यावी अशी सामन्य जनतेची मागणी आहे,
