Home यवतमाळ येळाबारा  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगितमय वातावरणात भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

येळाबारा  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगितमय वातावरणात भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

10

येळाबारा  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगितमय वातावरणात भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली

येळाबाराला ६ डिसेंबर २०२१ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ येळाबारा व फुले आंबेडकरी विचारमंच येळाबारा यांच्या भजनमय कार्यक्रम मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली…..
फुलांनी गुंफलेल्या डोली मध्ये विश्वरत्न बोधिसत्व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेऊन रात्रभर भजनमय वातावरणामध्ये श्रध्दांजली गिता द्वारे त्यांना रात्रभर भजनाद्वारे संपुर्ण येलाबारा येथिल बौद्ध उपासक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात.
तसेच आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळी सुध्दा असतात आणि दिनांक ०७ डिसेंबर ला सकाळी श्रधांजली गितातच त्या फुलांनी गुंफलेल्या डोलींचे सकाळी बौद्ध बांधवातर्फे बुध्द वंदना घेऊन वाघाडी नदिवर डोलींचे विसर्जन करण्यात येते…

Copyright ©