Home यवतमाळ योगक्षेत्रात विस्व कीर्तिमान विद्यार्थ्यांचा पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

योगक्षेत्रात विस्व कीर्तिमान विद्यार्थ्यांचा पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

10

योगक्षेत्रात विस्व कीर्तिमान विद्यार्थ्यांचा पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

 

यवतमाळ शहरातील नंदानू योग अनुसंधान बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 2 तास ते 9 तसा पर्यंत एकाच मुद्रेत स्थिर राहून योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल नाव नोंदविलेल आहे. त्या सर्व योग साधकांचा पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवार दिनांक 05 डिसेंबर 2021 ला दीनदयाल प्रबोधिनी यवतमाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमा मध्ये अध्यक्ष स्थानी- योगगुरू दिनेश जी राठोड (महाराष्ट्र राज्य प्रभारी पतंजली ),
प्रमुख अतिथी – राकेश जी भारद्वाज (ए.बी.वाय.एम योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे फाऊंडर,जयपूर राज.),
प्रमुख मार्गदर्शक – योगगुरू महेश जी जोशी
विशेष अतिथी – चंद्रकांत उप्पलवार (जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ )
चंदुकिशोर जैस्वाल ( नंदानू योग अनुसंधान संस्थेचे उपाध्यक्ष )
सौं प्रियंका पकडे ( नंदानू योग अनुसंधान संस्थेच्या सचिव )
विशेष उपस्थिती – सौं संतोषी साऊळकर , सौं कीर्ती राऊत (नगर सेविका ) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, दीपप्रज्वलनाणे झाली नंतर गणेश वंदना, रिदमिक योगा, मान्यवरांचे मार्गदर्शन आणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नंदानू योग अनुसंधान संस्था, समृद्धी योग स्टुडिओ, मिहिका योग स्टुडिओ च्या एकूण 85 विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी आरोही रोहित अग्रवाल तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योगगुरू प्रेमदास पकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी नंदानू योगमित्र परिवार चे ओमप्रकाश जी गणेडीवाल, विजय जी नथवानी, संजय सूतरावे, पियुष बजाज, दिनेश वासनिक यांनी मुख्य भूमिका पार पडली…

Copyright ©