Home यवतमाळ बळीराम पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बॉक्सिंग स्पर्धेत यश

बळीराम पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बॉक्सिंग स्पर्धेत यश

12

बळीराम पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बॉक्सिंग स्पर्धेत यश

(किनवट )स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व शिक्षणशास्त्र संकुल नांदेड च्या संयुक्त विद्यमाने इंडोर हॉल नांदेड येथे आंतर महाविद्यालयीन (क)झोन बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या बॉक्सिंग स्पर्धेत बळीराम पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . नांदेड येथे दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी आंतरमहाविद्यालयीन (क)झोन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठलसिंह परिहार ,सहयोगी अधिष्ठाता डॉ. बच्चेवार यांच्या अध्यक्षतेखाली,सिंकुकुमार सिंह क्रीडा विभाग प्रमुख,डॉ.केंगले, आदींच्या उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .महाविद्यालयाचे संघप्रमुख म्हणून प्रा. पुरुषोत्तम येरडलावार हे होते . या बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी *अभिषेक जायभाये 63 ते 67 वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केलं, तर रेहान शेख सलीम 57 ते 60 वजन गट ,संकेत दरडे 51 ते 54 वजन गट, रितेश जमदाडे 48 ते 51 वजन गटांमध्ये रौप्य पदक मिळविले तसेच 48 ते 51 वजन गटांमध्ये ओमकार शिंदे या विद्यार्थ्यांनी कास्य पदक मिळविले . विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, गंगारेडी बैनमवार सचिव शंकरराव चाडावार, कोषाध्यक्ष जसवंतसिंग सोखी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, संस्था समन्वयक प्रा .राजकुमार नेमानीवार, पर्यवेक्षक प्रा अनिल पाटील,राजेन्द्र धात्रक यांच्यासह डॉ. आनंद भालेराव, प्रा. डॉ. शुभांगी दिवे ,प्रा मंदाकिनी राठोड, प्रा.डॉ.प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा. शेषराव माने ,प्रा.डॉ.श्रीनिवास रेड्डी ,, प्रा. डॉ.सोमवंशी ,प्रा ममता जोनपेल्लीवार , प्रा डॉ. रत्ना कोमावार, प्रा सुलोचना जाधव,प्रा. ज्ञानेश्वर चाटे ,प्रा डॉ. स्वाती कुरमे,डॉ. पिंपळगावकर मॅडम आदींनी सर्व खेळाडूंचा व संघ प्रमुख प्रा पुरुषोत्तम येरडलावार यांचा अभिनंदन केले

Copyright ©