मंगरूळ येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा-
मंगरूळ (तरोडा) ता.जि. यवतमाळ येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. गावकऱ्यांना जाणीव जागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून मंडळातील तरूण उत्साही नेहमी कर्तव्यदक्ष असतात. सहा डिसेंबर रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजता ” सामुदायिक प्रार्थनेसह विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ” साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेचे महत्त्वाबरोबरच विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे . स्वातंत्र्य, समता बंधुता,न्याय आणि शिष्टाचार या लोकशाहीच्या पंचशील मार्गाने देश व समाज चालतो आहे. बाबासाहेबांनी शिक्षणावर भर देऊन समाजाने ज्ञानी बनावे हा संदेश दिला. अज्ञान हे मागासलेपणाचे द्योतक आहे. असे प्रसंगोचित विधान गुरुदेव सेवा मंडळाचे सल्लागार व राष्ट्रसंतांच्या विचारप्रवाहाचे अभ्यासक प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी केले.
सर्वप्रथम शिस्तबद्ध पद्धतीने सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्प गुरुदेव उपासकांतर्फे अर्पण करण्यात आले.
अध्यक्ष रामेश्वर गावंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे, सचिव अरुण सोनटक्के, कोषाध्यक्ष महादेव तुमडाम, ज्येष्ठ उपासक विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, डॉ अनंतकुमार सूर्यकार, संजय कांबळे, विजय ढोके, गणेश सोनोने, दीपक हारे, गणेश जोगे, शंकर पोहोरकर, सुधाकर धोंगडे, गणेश बनकर, रूपेश चव्हाण, मारोती पवूळ, नारायण सूर्यकार, दिलीप मोडले, गजानन मोडले, राधाताई मोडले, कांताताई मोडले, बहिणाताई कोडापे, जगताप काकू, परशुराम चव्हाण व गावातील स्त्री-पुरूष तसेच बालकांच्या उपस्थितीत हा निर्वाण दिन पार पडला. शेवटी राष्ट्रवंदना व ” कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडवीले..” हे सुंदर गीत डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी गायिले व रामेश्वर गावंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
