Home यवतमाळ “ घाटंजी वंचित बहुजन आघाडी, ने फुकले नगर परिषद चे रणसिंग”

“ घाटंजी वंचित बहुजन आघाडी, ने फुकले नगर परिषद चे रणसिंग”

11

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

“ घाटंजी वंचित बहुजन आघाडी, ने फुकले नगर परिषद चे रणसिंग”
——————————————–

घाटंजी- येणाऱ्या घाटंजी नगर परिषद निवडणुका ताकतीने लढविण्याच्या दृष्टीने घाटंजी शहराची जम्बो कार्यकारणी तयार करून घाटंजी नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग वंचित बहुजन आघाडीने फुंकले आहे. घाटंजी शहराच्या निवडणुका लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ची महिला आघाडी आणि शहर आघाडी साठी बैठक घेण्यात आली यामध्ये महिला व पुरुष मंडळीने सहभाग घेतला .
वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी तयार करण्यात आली हि कार्यकारणी केंद्रीय कार्यालय मुंबई येथून मान्यता आल्या नंतर घोषित केल्या जाईल व सोबतच घाटी येथील सामाजिक कार्यकर्ते दादाराव गीनगुले आणि मुरली येथील उमेश चौधरी यांनी पक्ष प्रवेश घेतला.
या सभेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष रणधीर खोब्रागडे,उपाध्यक्ष शैलेश भानवे,महासचिव श्याम खंडारे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धम्मवतीताई वासनिक,पुष्पाताई शिरसाट,वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव नितीनभाऊ राठोड,उपाध्य सिताराम वाघ,सचिव तुकाराम कोरवते,जेष्ठ मार्गदर्शक सुखदेव रामटेके,पद्माताई खोब्रागडे,विष्णुजी मुनेश्वर होते. सदर सभेचे सूत्र संचालन मनोज मुनेश्वर,प्रस्तावना प्रेमानंद उमरे आभार रा.वि. नगराळे यांनी मानले या सभेला बबीताताई , करुणाताई नरांजे , आशाताई रामटेके , कांचनताई शेंडे , पुनमताई मानकर , पुष्पाताई गजभिये , जिजाताई बन्सोड , अर्चनाताई चुनारकर , शालूताई पाटील , हर्षदा शेंडे , महिमा खोब्रागडे , सुनिताताई लोहकरे , पदमाताई खोब्रागडे , अनिल रामटेके , डोंगरसिंग खोब्रागडे , दादाराव गिणगुले , प्रल्हाद मारबदे , रवींद्र चुनरकर, विद्या मुनेश्वर , योगिता मूनेश्वर , शोभा कांबळे , शालिनी रामटेके , विजय सिसले , नामदेव कानिंदे , असीत भगत , सुनील कानाके , विनायक नगराळे , यशवंत भगत , दादाराव शेंडे , नंदकुमार देवतळे , उमेश चौधरी ,वीरेंद्र पिलावन , गौरव शेंडे , साहिल रामटेके , सुरज रामटेके , दीक्षांत वासनिक इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©