Home यवतमाळ पाथरी येथे मूर्ती प्रतिष्ठापना, महावंदना व धम्मदेशना कार्यक्रम

पाथरी येथे मूर्ती प्रतिष्ठापना, महावंदना व धम्मदेशना कार्यक्रम

12

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

पाथरी येथे मूर्ती प्रतिष्ठापना, महावंदना व धम्मदेशना कार्यक्रम
——————————————–
घाटंजी- कोरोना महामारी मुळे महावंदना व धम्मदेसना या कार्यात खंड पडला होता. मात्र यावर्षी पाथरी येथे महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा दि. 5 डिसेंबर रविवारला करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघ, फुले – आंबेडकरी साहित्य संसद तसेच पंचशील नवयुवक व महिला मंडळ पाथरी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर महा बंद नवा धम्मदेशना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत बुद्धघोष अमरावती राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो अमरावती यांचे हस्ते पार पडणार आहे. यावेळी पूज्य भदंत विपस्सी महाथेरो यवतमाळ, पूज्य भदंत धम्मवंश महाथेरो, पूज्य भदन्त सारिपुत्त थेरो, पूज्य भदंत श्रीपाद थेरो, पूज्य भदंत राहुल थेरो, पूज्य भदंत आश्वजीत थेरो, पूज्य भदंत श्रीलभ थेरो, पूज्य भन्ते सुबोध, पूज्य भन्ते जीवक,
पूज्य भन्ते मेधनकर, पूज्य आर्या प्रजापती पूज्य आर्या उरुवेला, पूज्य आर्या विशाखा आदींची उपस्थिती लाभणार आहे. सोबतच गेल्या पंधरा वर्षापासून महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करणारे फुले – आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ भगत, दानदाते शांतिदूत मुळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोडघाटे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 10 वा., महावंदना व धम्मदेसना कार्यक्रम,
त्यानंतर सत्कार समारंभ सोहळा व सायंकाळी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे प्रबोधनकार गायक मानकर बाबू आणि कव्वाल यांच्या भीम गीताचा कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा विनंती पंचशील नवयुवक व महिला मंडळ पाथरी यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून सुनील नगराळे व महेंद्र देवतळे यांनी दिली आहे.

Copyright ©