नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
ग्रामसेवक- विजयकुमार ठेंगेकर
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून नागरिकांनी लसीकरणा संदर्भातील कोणताही गैरसमज किंवा अफवांना बाजूला सारून विश्वासाने कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरुड भक्त येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले.
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, लसीकरणावर भर देण्यासोबतच आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याने काही ठिकाणी अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून आर्णी तालुक्यातील वरुड भक्त येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सी.आर.पी. व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी जनजागृती रॅली काढून घरोघरी जावून लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन गावात लसीकरण कॅम्प लागला असून पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याबाबत विनंती करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपसरपंच अरविंद चव्हाण, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, मुख्याध्यापक एस.एल.मुरखे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य सौ. निता काळे, सौ. मंजुषा खराबे, सौ. मंदा भुरले, सौ. रंजना शिरगरे, आशा वर्कर सौ.ज्योतीताई मानकर, अंगणवाडी सेविका सौ. सुनंदाताई काळे, सी.आर.पी. मायाताई कामडी, शिक्षक बी. एस.शेरकर, ए. आर.मुसळे, एच.एम.जाधव, आर. जे. गजभिये, आर.आर.गांजरे, जी एम.महल्ले, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र काळे, संगणक चालक गणेश राठोड, ग्राम रोजगार सेवक सुधाकर निंबाळकर प्रामुख्याने सहभागी झाले होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भातील गैरसमज
कोरोनाची लस गरम असते, ती घेतली तर माणसाला ताप येतो.’
‘कोरोनाची लस घेतली तर माणूस मरतो.’
‘कोरोनाची लस माणसाची ताकद कमी करते, माणूस कष्टाची काम करू शकत नाही.’
‘कोरोनाची लस घेतली तर माणूस नपुंसक होतो.’
‘माणूस मरावा म्हणूनच लस टोचतात.’
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी भागात पसरलेल्या या काही अफवा आणि गैरसमज आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणा संदर्भात ही माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहचणे महत्वाचे…
(1) आताही कोणालाही कुटुंबातील सदस्यांना देखील कोविड होऊ शकतो.
(2) कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी तितक्याच सुरक्षित व परिणामकारण आहेत आणि जी लस दिली जात आहे ती घ्यायला हरकत नाही.
(3) गरोदर आणि स्तनदा माता तसेच 18 वर्षाहून कमी वय असणाऱ्यांना सध्या लस दिली जाणार नाही.
(4) एखाद्याने लस घेतली की ती व्यक्ती स्वतःला संरक्षण मिळवते एवढेच नाही तर आजूबाजूच्या तसेच संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना असणारा धोकाही कमी करते.
(5) लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनंतर दिला जातो.या लसी मुळे आपले व इतरांचे स्वरक्षन आहे, आता प्रयंत देशात शंभर कोटी च्यावर लस घेण्यात आली आहे आपणही त्वरित लस घ्यावी असे गावात प्रभात फेरी द्वारे जनजागृती करण्यात आली आहे
