पत्रकारांवर भ्याड हल्याचा ग्रामीण पत्रकार संघा कडून तीव्र निषेध.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी दुःखद घटना घडली या घटनेत एका युवकाचा निर्गुण खून करण्यात आल्याने पुसद येथील आमदार निलय नाईक तसेच आमदार इंद्रनील नाईक घटनास्थळी गेल्याची बातमी कळताच पुसद येथून मुकाबला न्यूज २४ ची टीम बातमी संकलन करण्या करिता काळी दौलत खान येथे पोहोंचताच तिथे जमले ४० ते ५० लोकांनी मुकाबला न्यूज २४ चे अँकर सैय्यद फैजान आणि जय महाराष्ट्र चॅनल चे प्रतिनिधी संदेश कान्हू या दोघांवर शुक्रवार च्या रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास अचानक पणे भयाड हल्ला करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्त्यावर हजर पोलिसांच्या तत्परतेने हल्ले खोरांच्या तावडीतून सैय्यद फैजान आणि संदेश कान्हू यांची सुटका करण्यात आली मात्र हल्लेखोरांनी सैय्यद फैजान यांच्या जवळील बॅग, त्यामध्ये सैय्यद फैजान यांचा कॅमरा, माईक, रोख रक्कम आणि कागदपत्रे तसेच बुमआयडी लुटले यावेळी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील हल्ले खोरांना पंगविले यामुळे सुदैवाने संदेश कान्हू आणि सैय्यद फैजान यांचा जीववाचला.या घटनेचा स्व.पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,प्रमोद गवारकर जोतिबा पोटे, पवन धोत्रे, सुनील भाले,गोकुल खडसे,निलेश पवार,राजेश भागानगरकर, दत्तु कुशावार,सचिन चौधरी यांनी केली आहे



