Home यवतमाळ न्याय मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयातच तिने चक्क अंगावर घेतले पेट्रोल

न्याय मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयातच तिने चक्क अंगावर घेतले पेट्रोल

14

न्याय मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयातच तिने चक्क अंगावर घेतले पेट्रोल

यवतमाळ येथील जिल्हा अधिकारी अनाथ असलेली चंदा शामराव कासार वय 20 हिला न्याय मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयातच तिने पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करीत असता पोलिसांच्या सतर्कतेने होणारा अनर्थ टळला पेट्रोल अगावर घेताच पोलिसांनी चंदा नामक तरुणीला ताब्यात घेतले चंदा शामराव कासार हि वरूड ( ई.) येथील रहिवाशी असून तिला आई वडील नाही तिच्या वडिलांची गावातील जागा व शेती असून ती काकाच्या मुलाने त्या जागेवर घर बांधून कब्जा केला हिला राहण्यास घर तर नाही च पण जागाही नसल्याने हुसेन बंडू कासार यानेच तिच्या जागेवर अतिक्रमण केले हि त्याला जाब विचारायला गेली असता तिला बेदम मारहाण केली या प्रकरणी लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रारही दाखल केली परंतु दखल होत नसल्याने यवतमाळ तहसीलदार यांचे कडे तक्रार दाखल केली हे काम गटविकास अधिकाऱ्यांचे असल्याने गटविकास अधिकारी यांचे कडे गेली त्यांनी ग्रामसेवक यांना सांगितले त्याने तिला उडावा उडविचे उत्तर देऊन परत पाठवले तेव्हा जिल्हा अधिकारी यांचेकडे तक्रार दिली त्यांनीही दखल घेत नसल्याचे पाहून लोकशाही दिनात न्यायाची मागणी केली तिथेही न्याय मिळाला नसल्याने त्रस्त होऊन अखेर आज दुपारच्या दरम्यान जिल्हा अधिकारी यांच्या कडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता निराशा पदरात आल्याने जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सतर्कता दाखवीत तिचे प्राण वाचविले व शहर पोलिस स्टेशनला नेण्यात आले आता तरी तिला न्याय मिळेल का असा प्रस्न निर्माण झाला आहे.

Copyright ©