Home यवतमाळ बळीराम पाटील महाविद्यालयाचे व्हालीबाल व कबड्डी स्पर्धेमध्ये यश

बळीराम पाटील महाविद्यालयाचे व्हालीबाल व कबड्डी स्पर्धेमध्ये यश

14

बळीराम पाटील महाविद्यालयाचे व्हालीबाल व कबड्डी स्पर्धेमध्ये यश

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर रेणुका देवी महाविद्यालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन क झोन मुले मुली कबड्डी स्पर्धेचे व वालीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या व्हॉलीबॉल स्पर्धेचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्था, किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड व उद्घाटक म्हणून सचिव सौ.संध्याताई राठोड होते तर कबड्डी स्पर्धेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते ,उद्घाटक म्हणून सहाय्यक कुलसचिव दिगंबर तगलवार ,विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बच्चेवार, डॉ, अश्विन बोरीकर, विठ्ठल सिंह परिहार ,डॉ. डी के माने, डॉ. डी के कदम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेचे विजेत्या संघाचे सत्कार समारंभ किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांच्या वतीने व भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. संध्याताई राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. विजय संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम , गंगारेडी बैनमवार ,सचिव शंकरराव चाडावार, कोषाध्यक्ष जशवंत सिंग सोखी,प्राचार्य डॉ.शिवराज बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने आदीनी विजेत्या संघाचे आभिनंदन केले. संघ प्रमुख प्रा. पुरुषोत्तम येरडलावर यांनी व्हॉलीबॉल,कबड्डी संघ प्रमुख म्हणून काम पाहिले .विजेता संघाचे व संघ प्रमुखाचे संस्था व प्राध्यापकांच्या वतीने मनस्वी अभिनंदन केले.

Copyright ©