बाभूळगावात भाजप, काँग्रेस, राकाँला खिंडार
-सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन
नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची ताकद वाढली
यवतमाळ – बाभूळगाव येथे २१ डिसेंबरला होत असलेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी उलथापालथ झाली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज शिवसेना नेते आमदार संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेत शिवबंधन बांधले. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने बाभूळगावात पक्षाची ताकद वाढली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या अनेक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर खुश आहे. त्या अनुषंगाने गावोगावी शिवसेनेकडे अनेक राजकीय कार्यकर्ते आकर्षित होत आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद क्षेत्रात विकासकामे मार्गी लावणारे नगरविकास खाते हे शिवसेनेकडे आहे. शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे हे सध्या नगरविकास मंत्री आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संदीपान भुमरे तर माजी मंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे जिल्ह्याचे कार्यकुशल नेतृत्व आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेकडे आज निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा ओढा वाढला आहे.
आज बाभूळगाव नागरपंचायतीमधील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात भाजपच्या माजी नगराध्यक्ष कोमल खंते, पंचायत समिती माजी सभापती संगीता मालखुरे, संगीता प्रवीण लांजेकर, प्रवीण लांजेकर, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष तुषार इंगोले, काँग्रेसचे जेष्ठ नेते रिकभचंद तातेड, महिला काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्ष मदिना परवीन, शब्बीर खान, माजी उपसरपंच शब्बीर खान, नगरसेवक नईम खान, नितीन तातेड, संजय राऊत, अजीज कुरेशी, भीमा सोयाम, शीतल तातेड, गौरव तातेड, योगेश किनाके, झाकीर खान तसेच बाभूळगाव विकास आघाडीचे नगरसेवक सोनाली तातेड, अभय तातेड तसेच राष्ट्रवादीचे अमर शिरसाठ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांना आमदार संजय राठोड यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेश सोहळ्यामुळे बाभूळगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची स्थिती मजबूत झाल्याची प्रतिक्रिया आ. संजय राठोड यांनी यावेळी दिली. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या तत्वावर सामान्य नागरिकांसाठी सतत कार्यरत राहण्याच्या सूचना आ. संजय राठोड यांनी सर्व नवप्रवेशित शिवसैनिकांना दिल्या.
यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा परिषदेचे सभापती व उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा परिषदेचे सभापती विजय राठोड, माजी उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, शिवसेना शहर प्रमुख विक्रम बऱ्हाणपूरे, तालुका प्रमुख वसंत जाधव, महिला शहर संघटक ललिता वर्मा, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काळे, सतीश कावळे, प्रकाश भस्मे, नंदकुमार लांडे, प्रवीण लांजेवार, गुणवंत वरखंडे, कैलाश येवतीकर आदी उपस्थित होते.
