कार्यकारी संपादक राजू चव्हाण
विरुळ (कवठा) येथे शिक्षण परिषद व निवृत्त केंद्र प्रमुख यांना निरोप
——————————————–
घाटंजी- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घोटी केंद्राची शिक्षण परिषद व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख विजय चौधरी व वंदना तिवारी यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक ३० नोव्हेंबर मंगळवारला विरुळ (कवठा) प्राथमिक जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित करण्यात आला होता.
कोरोनाच्या निर्बंधाने सर्व शाळा ओस पडल्या होत्या. नुकतेच शासनाचे आदेश धडकून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. यातूनच पुढे विद्यार्थ्यांत पडलेला खंड अश्या अनेक बाबीचा विचार करून अध्यापन कार्य चांगले व्हावेत, कोरोनाचे सर्व निर्बंध बाळगून विद्यार्थांना चांगले शैक्षणिक धडे कसे गिरविता येईल असा मानस पुढे ठेवून केंद्र प्रमुख अविनाश खरतडे यांच्या मार्गदर्शनात विरुळ (कवठा) येथे घोटी केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद घेण्यात आले. याक्षणी या केंद्रात सर्व शिक्षकासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून उत्कृष्ट कार्य करणारे मनमिळावू स्वभावाचे केंद्र प्रमुख विजय चौधरी हे मागील कोरोना काळात निवृत्त झाले. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्यांना निरोप देता आले नव्हते मात्र काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने यावेळेस निवृत्त केंद्र प्रमुख विजय चौधरी व वंदना तिवारी यांना शाल व श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख चौधरी यांनी घोटी केंद्रातील शिक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आपण भारावून गेलो होतो. सर्व शिक्षकाचे मोलाचे योगदान मिळाले असे सांगत विस्तृत प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर घोटी केंद्राचे केंद्रप्रमुख अविनाश खरतडे, केंद्र मुख्याध्यापक डी. डी. पुसनाके, स. शि. पाटा योगिता शिंदे, साधन व्यक्ती श्रीकांत पायताडे यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी घोटी केंद्रातील सर्वत्र शिक्षक वर्ग उपस्थित होते. या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या शिक्षण परिषदेच्या व निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरुळ (कवठा) शाळेचे मुख्याध्यापक संदीप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन स. शि. लीना लढे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारी येथिल मुख्याध्यापक भाऊ पत्रे, माजरी मुख्याध्यापक दिलीप संगनवार, कोपरी मुख्याध्यापक भाऊ गेडाम, स. शि. विरेश्र्वर चीलकावार, भाऊ तंबाखे, मोबिन पाशा शेख यांनी मेहनत घेतली.
