स्नेहल ढोकेचा आदर्श इतरांनी घ्यावा – चंद्रकांत हंडोरे
———————————————
घाटंजी- कौटुंबिक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळून सुद्धा युपीएससी परीक्षेमध्ये देशांमध्ये आर्णी तालुक्याचा नावलौकिक करणाऱ्या स्नेहल ढोके चा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं सूचक वक्तव्य माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले. सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामपंचायत केळझरा यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार व जानकाबाई नामदेवराव भगत यांच्या 90 व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मातोश्री जानकाबाई यांच्या कार्याचा गौरव करून शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात क्षेत्रात सदर कुटुंबियांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. मि सामाजिक न्याय मंत्री असताना महाराष्ट्र राज्यात 353 तालुक्यात शंभर निवासी शाळा उभारण्याचे काम माझ्याकडून झाले असून त्याच मोघे साहेबांचा सुद्धा हातभार लागलेला आहे. अविनाश भगत हा माझा सच्चा सहकारी असून राजकीय क्षेत्रात जितेंद्र मोघे यांनी त्याला सोबत घ्यावे असे सुद्धा ते प्रसंगी म्हणाले.
प्रसंगी स्नेहल ढोके यांचा सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर जानकाबाई यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व भगत परिवार व आप्तस्वकीय या सर्वांनी मिळून विशेष सत्कार केला. दर्शन दुगड, बंकेश पवार व दीक्षा भवरे यांच्या प्रतिनिधींना सुद्धा शाल-श्रीफळ व भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. यावेळी बाळासाहेब मांगुळकर, जि प सदस्य स्वाती येंडे, बाळासाहेब शिंदे, मनोज सागोळे ( नगरसेवक नागपूर) दिलीप भोजराज ( भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी), पंकज मेश्राम (भीमशक्ती विदर्भ अध्यक्ष), जितेंद्र मोघे, सौ किरण मोघे, मीनाताई ढोके, महानाग रत्न (मानसशास्त्र तज्ञ), ऍड. यशवंत मेश्राम (भीमशक्ती तथा काँग्रेस कमिटी), एन. के. कांबळे (भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी), विनोद चव्हाण (ठाणेदार पारवा), विजय मेश्राम (समाजसेवक नागपूर), विजय मोघे, माजी जि प सदस्य मुबारक तव्वर, राजूभाऊ निकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना शिवाजीराव मोघे यांनी जानकाबाई नामदेवराव भगत व स्नेहल अविनाश भगत यांच्या कार्याची प्रशंसा करून किशोर भगत परिवाराने राबवलेल्या सामाजिक कार्याचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला.
पारवा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी जानकाबाई भगत यांच्या प्रती सादर केलेल्या
“माझे हात, हातात तुझ्या आई,
मी चालतो, ठाई ठाई,
अशीच तुझी थाप असुदे पाठीवरी आई,
मी सर्व जग जिंकेल ठाई ठाई” ह्या ओळी ला उपस्थितांनी दाद दिली. व स्नेहल ढोके यांचा यांचे स्वागत माझ्याकडून केल्यामुळे अत्यानंद झाल्याचे सांगून अनेक कार्यक्रमांना आम्हाला फक्त समोरच उभे राहावे लागते. मात्र भगत कुटुंबीयांनी मला हा सन्मान दिल्यामुळे त्यांनी आभार सुद्धा मानले.
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील जनतेने प्रचंड गर्दी केली होती. त्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या नागपूर येथील राजेश बुरबुरे म्युझिकल शो ने उपस्थितांची मने जिंकली तर माळेगाव येथील सुनील चव्हाण यांनी गीत सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर भगत, संचालन मनोहर चांदेकर, सूनील वेले तर आभार जयश्री भगत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रा. प. तसेच नेहरू विद्यालय केरझळा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव व शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय घाटंजी च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
