Home यवतमाळ यवतमाळच्या आकाश शेंडे ची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी

यवतमाळच्या आकाश शेंडे ची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी

20

यवतमाळच्या आकाश शेंडे ची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी

येथील रहिवासी आकाश शेंडे नामक कलाकाराने अभिनय क्षेत्रातील आपल्या कर्तुत्वाने यवतमाळरांची मान उंचावली आहे. लोकनायक बापुजी अणे विद्यालयात आकाशने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून कॉम्पुटर सायंस इंजिनीरिंग पूर्ण केले. यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात नशीब अजमाविण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने थेट मुंबई गाठली. अभिनय क्षेत्रात कुठलीच ओळख नसताना, स्वतःची ओळख निर्माण करून बऱ्याच परिश्रमा नंतर स्वप्ननगरीचा प्रवास त्याने पूर्ण केला. त्याने आतापर्यंत स्टार प्रवाह चॅनलवरील “विठू माऊली”, झी मराठी चॅनलवरील “अग्गबाई सासूबाई” या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो अभिनेत्री प्रिया मराठे हिचे बरोबर “येऊ कशी तशी मी नांदायला ” या टीव्ही मालिकेमध्ये काम करतोय. येणाऱ्या काळात आकाश एका बिग बजेट हिंदी सिनेमामध्ये सुद्धा झळकणार आहे. आकाशने अत्यल्प वेळेत मिळविलेल्या कर्तृत्वाने यवतमाळकरांची मान पुन्हा एकदा उंचावल्या गेली आहे. त्याच्या पुढील कामगिरीसाठी यवतमाळकरांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Copyright ©