Home यवतमाळ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भव्य नागरी सत्कार

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भव्य नागरी सत्कार

23

 आसिफ खान सावळी सदोबा प्रतिनिधी

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भव्य नागरी सत्कार

केळझरा(वरठी) येथे सौ.स्नेहल अविनाश भगत (ढोके)तथा केळझरा येथील भगत कुटुंबीयांची सून यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून 564 वा क्रमांक मिळवून यश संपादन करून त्यांनी आर्णी तालुक्याचा नाव देशपातळीवर लौकिक केले,त्या निमित्य त्यांचा भव्य नागरी सत्कार व श्रीमती जानकाबाई नामदेवराव भगत यांच्या नव्वदव्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक 28 नोव्हेंबरला नेहरू विद्यालय केळझरा येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ केळझरा व ग्रामपंचायत केळझरा यांच्या वतीने करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मा.शिवाजीराव मोघे,मा.चंद्रकांत हंडोरे (माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)मा.बाळासाहेब मांगुळकर,मा.जितेंद्र मोघे,विजय मोघे, किरणताई मोघे,स्वातीताई येडे यांच्या हस्ते स्नेहल अविनाश भगत (ढोके)उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,दिलीप भोजराज (भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी),रमेश कटके (डी.डी आर यवतमाळ),पंकज मेश्राम (भीमशक्ती विदर्भ अध्यक्ष),महानाग रत्न (मानसशास्त्र तज्ञ),दीपक चवणे (शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ).यशवंत मेश्राम (भीमशक्ती तथा काँग्रेस कमिटी)एन. के. कांबळे (भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी),विनोद चव्हाण (ठाणेदार पारवा),विजय मेश्राम (समाजसेवक) बाळासाहेब शिंदे मुबारक तंवर,रामचरण चव्हाण,प्रल्हादराव जगताप, विजय भगत,नामदेव चव्हाण,किशोर भगत, वामन नाईक,नुनेश आडे,सह 80 तास चार मिनिट सतत गायन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेल्या नागपूर येथील राजेश बुरबुरे म्युझिकल सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,या कार्यक्रमात उत्कृष्ट गायक सुनील चव्हाण यांनी प्रितीच झुळ झुळ पाणी हे गाणे स्त्री व पुरुष यांच्या आवाजात गायन करून,उपस्थितांचे मन वळवून घेतले,या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©