शहर उपाध्यक्ष यांच्या सह कार्यकर्त्यांचा मनसे ला जयमहाराष्ट्र
यवतमाळ दि.२७ नोव्हेंबर -: नगर परिषद निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आपली चूल वेगळी करण्याच्या हेतूने नुकताच मनेसे मधून जयमहाराष्ट्र करण्याचे ठरविले सेनेमध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असलेले महाराष्ट्र सैनिक तथा वाघापूर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व टिकवून ठेवणारे शहर उपाध्यक्ष संदीप भिसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेर जय महाराष्ट्र केला असल्याने चर्चेला उधाण आले.यवतमाळ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी शिल्लक असतांना व येणारी निवडणुक तोंडावर असतांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जबर धक्का बसला आहे.केवळ पाच ते सहा पदाधिकाऱ्यांच्या भरोशावर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण,समाजकारण सुरू असल्याचा आरोप करीत पक्षातील अंतर्गत कलह व वरिष्ठ पदाधिकारी सामान्य पदाधिकाऱ्यांना कुठलेही महत्त्व देत नसल्याने शहरातील अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सपशेल अपयशी ठरलेली दिसत असल्याचेही संदीपने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तसेच काही पदाधिकारी शहरातील पदाधिकाऱ्यांना डावलुन परस्पर निवेदने देणे तसेच परस्पर विषय हाताळत असल्यामुळे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे बोलल्या जात आहे.यालाच कंटाळून अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना अनेक समाज उपयोगी उपक्रम, प्रभागातील विविध विषय हाताळणारे संदीप भिसे यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला सौरभ पत्रकार सारंग सुलभेवार,हरिष कोहळे,गणेश खताडे
व प्रज्वल पत्रकार शिवम सोळंकी
सुरज पारधी प्रणय डोईजड निलेश आडे शिवा माने शिवम निंबळे,रोहन निबळे अभिषेक चिंचावडे व 25 ते 30 कार्यकर्ते यांचा समावेश आहे
