हीवरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत घरो घरी लसीकरण
पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार !
हीवरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत घरो घरी जाऊन वृध्द ,अपंग, यांना लसीकरण करण्यात येत आहे गावातील काही वृध्द येऊ शकत नसल्याने त्यांना घरी जाऊन ,मिळेल तिथे लसी करने सुरू केले आहे येथील नाम मात्र लाभार्थी राहिले असल्याने त्यांना लस घेण्यास महिला बचत गट,ग्रामपंचायत सदस्य पो.पा.जागरूकता करीत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका वनिता गिलबिले व आशा स्वयम सेविका सुनीता जयस्वाल यांनी चक्क घरी जाऊन लसीकरण करणे सुरू केले आहे या वेळी अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला हिवरी येथील लसीकरणाचां पहिला टप्पा पूर्णत्वाकडे असून जवळपास सात दिवसात शंभर टक्के लसीकरण होण्याची शक्कता निर्माण झाली आहे.
