Home यवतमाळ हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासस्थान पडले ओसाड

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासस्थान पडले ओसाड

7

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासस्थान पडले ओसाड
———————————————
सात निवासस्थानापैकी एकाच परिचारिकेची वास्तव्य
———————————————
तालुका व जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
———————————————
यवतमाळ- तालुक्यातील सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेल्या हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्र परत एका चर्चेला घेवून पुढे आली असून या आरोग्य केंद्रात १५ कर्मचाऱ्यांचा वर कर्मचारी कार्यरत आहे. त्यात शासनाने लाखो रुपये खर्च करून कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी भव्य इमारती उभारल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या वास्तूत केवळ एकच परिचारिका वास्त्यव्यास राहत असल्याने बाकी निवासस्थान ओसाड पडले आहे. यांची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढे असताना सुध्दा तालुका व जिल्हा आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
आरोग्य केंद्र म्हटले की कधी कधी कसा रुग्ण येईल याचा नेम नाही. त्याला त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार मिळणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांचे सह आरोग्य कर्मचारी निवासी असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाने त्यांचेसाठी निवासस्थानाची व्यवस्था सुध्दा करून दिली मात्र काही वर्षांपासून या आरोग्य केंद्रात एकच परिचारिका वास्तवास राहत असल्याने येथिल आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. प्रथमच या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा डोके दुःखी ठरत असताना बाकी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या राजकिय हस्तक्षेप व त्यांचे वरदहस्त याला कारणीभूत ठरत आहे. येथिल कर्मचारी रात्री तर राहणे सोडाच मात्र दिवसात सुध्दा वेळ सोडून अवेळी येणे मनाच्या मर्जीप्रमाणे निघून जाणे हे नित्याचे झाले आहे. याबाबीची ग्राम पंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी यापूर्वी तक्रारही केली. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराने मोठ्या प्रमाणात व्यापला असून मजूरदार , शेतकरी, शेतमजूर वर्गा सोबत गरीब जनता वास्त्यव्यास राहतात. त्यांना कोणताही आजार झाल्यास आपल्या हक्काच्या आरोग्य यंत्रणेचा आधार घ्यावे लागते. मात्र येथिल ढेपालेल्या आरोग्य यंत्रणेमुळे या परिसरातील रुग्णांचे हाल होत आहे. आणि लक्षाधीश रुपये खर्च करून बांधलेले निवास ओसाड पडले असून गलेलठ्ठ पगार घेऊन येथिल आरोग्य कर्मचारी शहरात वास्तव्य करीत आहेत. या आरोग्य केंद्रात रात्री दरम्यान एखादी रुग्ण गेल्यास हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की शमशान भूमी असा विचित्र प्रकार या ठिकाणी पहावयास मिळत आहे. केवळ येथे प्रामाणिक कार्य बजावणाऱ्या एका परीचारिकेला येथे उपस्थित पाहून समाधान मानावे लागत आहे. आरोग्याच्या नावावर शासन स्तरावरून नानाविध प्रकारचे उपाययोजना करीत कित्येक निधी खर्ची घालतो. मात्र हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील केवळ नावाला सेवा देत आहे. मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना या नियमाला डावलून मनमानी पद्धतीने वागत आहेत. ही बाब तालुका व जिल्हा आरोग्य विभागाला माहीत असताना ही ते सुध्दा दखल घेवून येथिल कर्मचाऱ्यांना वठणीवर आणत नाही हा सुध्दा एक संशोधनाचा विषय असून न समजणारे कोड आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी या आरोग्य केंद्राकडे लक्ष घालून येथिल कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास भाग पाडावे व येथिल आरोग्य सेवा सुरळीत आणावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत असून येथिल आरोग्य सेवा सुरळीत न झाल्यास मोठे जनआंदोलन करू असेही बोलल्या जात आहे.

Copyright ©