प्रतिनिधी लाडखेड अन्सार खान
संविधान सप्ताहानिमित्त लाडखेड येथे संविधानाचे वाटप
——————————————–
पाढुर्णा आदर्श चे सरपंच रत्नदीप पवार यांचा पुढाकार
लाडखेड- संविधान सप्ताहाचे औचित्य साधून समारोपीय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्यक बुध्द विहार लाडखेड येथे दिनांक २७ नोव्हेंबर ला आयोजित करून पांढुर्णा (आदर्श) चे उच्च शिक्षित सरपंच तथा अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रत्नदीप पवार यांच्या तर्फे घरा घरात संविधानाचे वाचन व्हावे हा मानस पुढे ठेवून संविधानाचे वाटप करण्यात आले.
२६ नोव्हेंबर संविधान दिना निमीत्त संविधान सप्ताह राबविण्यात आला या सप्ताहाचे समारोप कार्यक्रम आयोजित करून सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रत्नदीप पवार यांनी संविधानाबद्दल सर्वांना माहिती व्हावी घरा घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधान पोहचावे हा मानस पुढे ठेवून विस्तृत मार्गदर्शन केले. ते बोलतांना म्हणाले भारतात सन २०२० पर्यंत ७५ टक्के लोकसंख्या साक्षर आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान अर्पण करून ७२ वर्ष पूर्ण झालीत. तरीपण संविधानाची जनजागृती का आणि कुठे थांबली असावी हे कळत नाही. जर आपले ग्रंथ अन्न, पाणी समजू तर संविधान श्वास आहे असे समजावे सर्वांनी भाग तीन मधील अनुच्छेद १२ये३५ मूलभूत हक्क व भाग चार अ अनुच्छेद ५१ अ मूलभूत कर्तव्य वाचून स्वतः अंगीकारुन वास्तव्यात संविधानाची जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. असे सांगितले आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी सुध्दा आपल्या अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. यासोबतच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाडखेडचे सरपंच माणिकराव चिरडे, उपसरपंच मनोज दुधे, दारव्हा पंचायत समिती सदस्या सौ. शारदा यशवंत दुधे, राजु सिरसाठ, नूर खान सर, तंटा मुक्ती अध्यक्ष अब्दुल रशीद, पांढुर्णा (आदर्श) चे माजी सरपंच यादवराव पवार हे होते. याचक्षणी संविधानाचे चाळीस प्रती मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडखेड युवा शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष सचिन तायडे, अन्सार खान, नितेश दुधे, निखिल सिरसाठ, विनोद नवदुर्गे, नंदू अवसार, मोहम्मद खान, भवन सगने, निखिल टाके, व रत्नदीप पवार मित्र मंडळाचे वामनराव उके, राहुल नन्नावरे, देव कुमार जाधव, रोहित राठोड, बालू आडे, केवलसिंग पवार, राजदीप पवार, निरंजन राठोड यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मेश्राम यांनी केले तर आभार अन्सार खान यांनी मानले.
