कार्यकारी संपादक राजू चव्हाण
बोदडी येथे क्रांतिकारी शामा दादा कोलाम यांची जयंती साजरी
——————————————–
घाटंजी- कोलाम समाजातील क्रांतिकारी म्हणून ज्यांची ओळख होती असे क्रांतिकारी शामा दादा कोलाम यांची जयंती बोदडी येथिल समाज बांधवांनी साजरी केली.
शामा दादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोलाम समाजातील युवक वर्गानी एकत्र येत कार्यक्रमाचे एक सुंदर नियोजन केले होते. यादरम्यान समाज प्रबोधनकार व कीर्तनकार गंगाधर लोनसावळे महाराज यांनी समाजाला आपल्या प्रबोधनातून व कीर्तनातून समाजात जनजागृती केली. यावेळी उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ व वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण हे होते तर कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून बंडू जाधव होते. या कार्यक्रमात ठाणेदार विनोद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर बंडू जाधव यांनी सुध्दा यावेळी आपले विचार मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास कूमरे, अक्षय आत्राम, सरपंचा उषाताई आत्राम, उपसरपंचा नर्मदाबाई रमेश जाधव, ग्राम पंचायत सदस्य एकनाथ टेकाम, सुदर्शन आत्राम, प्रकाश मरापे, संगीताबाई उरकुडे, मीराबाई धुर्वे, पोलीस पाटील अतुल सेवतकार यांचे सह माजी उपसरपंच आकाश राठोड, अशोक पिंपळकार, वसंता उरकुडे, नीळकंठ निम्रटकार, ओंकार कामडी, चेतन जाधव, अनुप जाधव, प्रशांत सेवतकार, भगवान टेकाम, दिलीप आत्राम, जैतू टेकाम, मनोज पुसनाके, राम बाजपेयी, भास्कर काकडे, रोशन कामडी इत्यादी गावकरी उपस्थित होते. समाज बांधवांनी उपस्थितांचे आभार मानले.
