कार्यकारी संपादक राजू चव्हाण
संविधान दिन व २६/११ मधील शहीद वीरांना श्रद्धांजली कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तीस पारवा ठाणेदाराकडून मायेचा पाझर
———————————————
घाटंजी- पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावळी (सदोबा) येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सविधान दिनाचे व २६/११ मधील शहीद वीरांना श्रद्धांजली चा कार्यक्रम पारवा पोलीस स्टेशन कडून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकात एक दिव्यांग व्यक्ती आले होते. हे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या लक्षात येताच चक्क त्यांनी स्वतः त्या दिव्यांग बांधावास उचलून खुर्चीवर बसवून दिल्याने या ठाणेदारातील मायेचा पाझर उपस्थितांना अनुभवता आला.
सध्या महाराष्ट्रभर ज्यांचे कार्य गाजत आहे असे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दुरक्षेत्र सावळी (सदोबा) येथे सविधान दिनाचे व २६/११ मधील शहीद वीरांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारवा पोलीसाकडून कार्यक्रम म्हणून बहुसंख्येने नागरिक उपस्थित झाले. यात एक दिव्यांग बांधव ज्यांना चालता व सुरळीत बसता सुध्दा येत नव्हते अश्या व्यक्तीवर ठाणेदार विनोद चव्हाण यांचे लक्ष गेले ते एखाद्या नागरिकाला किंवा त्यांच्या एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगून त्या दिव्यांग व्यक्तीला खुर्चीवर बसवायला लावू शकले असते. मात्र त्यावेळेला तसे विचार न करता एक सेवा समजून स्वतः त्यांना उचलून खुर्चीवर बसवून दिले. हा परत त्यांच्याकडून एक माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले. हा भावूक क्षण बघताना काही लोकांनी येथील हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपून सोशल मीडियावर वायरल करीत “एक ही दिल है साहब कितनी बार जितोंगे”अश्या प्रतिक्रिया उमटवित आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांचे दिव्यांगा वरील मायेचा पाझर आजचे माणुसकीचे दर्शन देणारा क्षण जवळून उपस्थितांनी बघितल्याने सर्वच भावूक होवून असा ठाणेदार भेटणे हे आपले भाग्यच समजत होते.
